विशेष प्रतिनिधी
नागपूर : तुमची चूक असेल तर गुन्हा दाखल होईल. गुन्ह्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडा. उद्या यांना ठेच लागली तरी देवेंद्र फडणवीस यांनी केलं असे सांगतील, असा टोला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी लगावला.
माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले,
आम्ही सांगू तेच खरं आणि आमच्यावर कोणीही गुन्हा दाखल करु नये असं यांना वाटते. तुमची चूक असेल तर गुन्हा दाखल होईल. गुन्ह्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडा. उद्या यांना ठेच लागली तरी देवेंद्र फडणवीस यांनी केलं असे सांगतील.
नागपूर फिल्मसिटीबाबत मुनगंटीवार म्हणाले, हे काम
वेगाने व्हावी ही माझी संकल्पना आहे.आम्ही पूर्ण शक्तीने, वेगाने काम करण्याचा निर्णय केला आहे. आताच या विभागाचे आमदार आशिष जैस्वाल यांच्याशी माझी चर्चा झाली, त्यांना सांगितले आहे की आवश्यकता असेल तर तुमच्या प्रमुख उपस्थितीत समिती नेमू. कोल्हापूर, मुंबईमध्ये चित्र नगरी आहे मग नागपूरमध्ये एखादी चित्रनगरी झाली तर विविध चित्रपट, मालिकांसाठी याचा उपयोग होईल. मला विश्वास आहे की विदर्भात ही चित्रनगरी अतिशय यशस्वीपणे उत्तम कार्य करु शकेल.
महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. निश्चितपणे सरकारच्या वतीने नुकसान भरपाई दिली जाईल, असे ते म्हणाले.
कॉंग्रेस वाल्यांनी ठरवलं आहे की जोसेफ गोबेल जो जगातील सर्वांत खोटं बोलणारा आहे त्याला मागे टाकण्याचा त्यांचा निर्धार आहे, असा आरोप त्यांनी केला.
Sudhir Mungantiwar target opponants MVA
महत्वाच्या बातम्या
- Suhas Yathiraj : पॅरालिम्पिक 2024: भारताला 12वे पदक, सुहास यथीराजने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले
- PM Modi : …म्हणून पंतप्रधान मोदींनी पुन्हा घेतले भाजपचे सदस्यत्व!
- 2 महिन्यांवर निवडणूक आली तरी, महाराष्ट्रात काँग्रेस मुख्यमंत्री ठरवेना; पण 5 वर्षांनंतरच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाचा 100 % वायदा!!
- Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर मोठी दरड कोसळली, अनेक लोक अडकले