राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव येथे हिंसक घटना घडल्या आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चिखलफेक सुरु झाली आहे.Such riots happen whenever Sharad Pawar’s government comes; Former state minister Anil Bonde accused
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अमरावती, नांदेड मध्ये ज्या दंगली होत आहे त्या शरद पवार यांच्या आशीर्वादाने होत आहे. जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा अशा दंगली घडतात, असा आरोप राज्याचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केले आहेत.अनिल बोंडे यांनी ट्विट करुन शरद पवार यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत.
त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना पहायला मिळत आहे. राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव येथे हिंसक घटना घडल्या आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चिखलफेक सुरु झाली आहे.
अमरावतीमध्ये जो हिंसाचार झाला तेव्हा पोलीस कुठे होते? आज सर्व हिंदू रस्त्यावर उतरले तर पोलीस प्रशासन सरकार व नेत्यांच्या दबावाखाली आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी सुद्धा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, आज पोलिसांनी आंदोलक हिंदूंना अडवले त्यांच्यावर लाठीमार, पाणी फेकले, अश्रूधुराचा वापर केला. परंतु हे मुस्लिम आज सुद्धा खुलेआम देशी कट्टे आणि तलवारी घेऊन फिरत आहेत. परंतु कारवाई फक्त हिंदुवरच का? पोलीस प्रशासन ह्यांच्यावर का कारवाई करीत नाही, त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे हे आधी स्पष्ट करावे, अशी मागणीही अनिल बोंडे यांनी केली आहे.
Such riots happen whenever Sharad Pawar’s government comes; Former state minister Anil Bonde accused
महत्त्वाच्या बातम्या
- सौर सेल निर्मितीसाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल, PLI निधी 24 हजार कोटींपर्यंत वाढवला
- Punjab Election 2022 : अभिनेता सोनू सूदची बहीण लढवणार पंजाब विधानसभा निवडणूक, मात्र पक्षाचे नाव अद्याप गुलदस्त्यात
- शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले नाही; फडणवीसांनी दिली होती चुकीची कबुली; विक्रम गोखलेंच्या दाव्याने खळबळ
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : पायी चालणाऱ्यांच्या संरक्षणसाठीही आता मोटारीत एअर बॅग