नाशिक : मुंबई परिसरातल्या नऊ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची सफल चर्चा झाली, पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मात्र भाजपने अजितदादांना धक्का द्यायचे ठरविले. त्याचबरोबर मुंबई परिसरातल्या महापालिकांमध्ये महायुती करताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दुसरे स्थान तर अजित पवारांनी नवाब मलिकांना बाजूला ठेवले तरच तिसरे स्थान द्यायचा निर्णय भाजपने घेतला.
नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सगळेच पक्ष स्वबळावर लढल्यानंतर महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय गरजेनुसार महायुतीतले घटक पक्ष एकत्र आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी दीर्घकाळ वाटाघाटी केल्या. त्यानंतरच त्यांनी महायुती सर्व महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र निवडणुका लढवेल, असे जाहीर केले. स्थानिक पातळीवर महत्त्वाच्या चार-पाच नेत्यांची समिती स्थापन करून जागा वाटपाचा निर्णय घेऊ, पण महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जावू, असे ते म्हणाले.
– पुणे + पिंपरी चिंचवड साठी वेगळा निकष
पण त्याच वेळी भाजपने मुंबई परिसरातल्या नऊ महापालिकांसाठी वेगळा निकष आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड साठी वेगळा निकष लावल्याचे समोर आले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका परिक्षेत्रांत भाजपचे स्वबळ मोठे आहे त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची संघर्ष आहे त्यामुळे अजित पवारांशी निवडणुकीपूर्वी जुळवून घेण्याऐवजी निवडणुका स्वबळावर लढवून नंतर गरज असेल, तरच अजित पवारांची जुळवून घेण्याचा इरादा भाजपच्या नेत्यांनी प्रत्यक्ष बोलून नाही, तर कृतीतून दाखवून दिलाय. त्यामुळेच भाजपची उमेदवारी मिळवण्याच्या रांगेत राष्ट्रवादीचे नेते सुद्धा उभे राहिलेले दिसले.
– नवाब मलिक प्रकरणात कठोर भूमिका
त्याचवेळी मुंबई परिसरातल्या महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपने राजकीय गरजेनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी जुळवून घेतले, तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तितके जुळवून घेतलेले नाही किंबहुना नवाब मलिक प्रकरणात कठोर भूमिका घेऊन भाजपने अजितदादांना तिसऱ्या क्रमांकावरूनही आणखी खाली ढकलण्याचा डाव खेळल्याचे उघड दिसून आले.
– अजित पवारांची गोची
यातून पवार काका – पुतण्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय भाजपने ठेवला नाही पण तरीसुद्धा पार्थ पवार जमीन प्रकरणाचा राजकीय फास अजितदादांच्या भोवती आवळून पवार काका – पुतणे एकत्र येऊन ताकद लावून निवडणुका लढवण्याची परिस्थिती सुद्धा भाजपने शिल्लक ठेवलेली नाही.
Successful discussions on a grand alliance among municipalities in the Mumbai area
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार- मुंबई लुटणाऱ्यांनी अमित शहांवर बोलू नये; स्वत:चे पायपुसणे करून घेणाऱ्यांना टीका करायचा अधिकार नाही
- Delhi HC : इंडिगो संकटावर दिल्ली हायकोर्टाने सरकारला फटकारले; ₹4 हजारांचे तिकीट ₹30 हजारपांर्यंत कसे पोहोचले; तुम्हीच ही परिस्थिती निर्माण होऊ दिली
- पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर आठवड्याच्या आतच ट्रम्पचा मोदींना फोन; जागतिक सामरिक सहकार्यावर चर्चा!!
- कायदा खुंटीवर टांगून ममतांच्या TMC खासदाराने संसद परिसरात ओढली इ सिगरेट; वर त्याचे केले समर्थन!!