विशेष प्रतिनिधी
पुणे : जे 2023 च्या दिवाळी पर्यंत घडले नव्हते ते आता 2024 च्या दिवाळीत घडणार पवारांच्या दिवाळीचे फटाके दोन वेगवेगळ्या ठिकाणी फुटणार आणि त्याचबरोबर पवार म्हणजे निवडणुकीतले यश हे समीकरण लयाला जाऊन निवडणुकीत पडणाऱ्या पवारांची संख्या देखील वाढणार!!
शरद पवार आणि अजित पवारांचे पाडवे दोन वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे गोविंद बागेत आणि काटेवाडीत साजरी होणार आहेत. एरवी पवार कुटुंबीयांची दिवाळी एकत्र होण्याचा महाराष्ट्रात गाजावाजा होतो. पवारांनी कितीही राजकारण केले, तरी कुटुंब कसे एकच ठेवले आहे, याची रसभरीत वर्णने मराठी माध्यमे करतात. तशी ती यंदाही मराठी माध्यमांनी केली, पण आता 2013 च्या दिवाळीपर्यंत जय घडले नव्हते, ते 2024 च्या दिवाळीत घडणार आहे. पवारांच्या दिवाळीतल्या पाडव्यामध्ये फूट पडली असून शरद पवारांचा दिवाळीचा पाडवा गोविंद बागेत, तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत साजरा होणार आहे. स्वतः अजित पवारांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून बारामतीकरांना काटेवाडीतल्या पाडव्याचे निमंत्रण दिले आहे.
त्याचबरोबर पवार म्हणजे राजकारणातले आणि निवडणुकीतले यश हे समीकरण देखील तुटणार आहे. कारण 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत होणाऱ्या पवारांची संख्या देखील वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीत आपली पत्नी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळे विरुद्ध उभे करून पवार कुटुंबामध्येच लढाई लावली, ही आपली चूक होती, याची कबुली अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर लगेच दिली होती, पण आता ती चूक शरद पवारांनी युगेंद्र पवारांना विधानसभा निवडणुकीत उतरवून केली आहे. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात कोणता तरी एक पवार पराभूत होणार आहे. म्हणजेच निवडणुकीत पडणाऱ्या पवारांची संख्या वाढणार आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातून अजितदादांचे पुत्र पार्थ पवार पराभूत झाले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. आता बारामती विधानसभा मतदारसंघात एकतर अजित पवार पराभूत होती किंवा त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार पराभूत होतील. याचा अर्थ अजित पवारांच्या सख्ख्या घराण्यातलाच कुणीतरी एक पराभूत होईल. त्यात शरद पवारांचे विजय किंवा पराजयात काही नुकसान होणार नाही. पवारांच्या दिवाळीचे दोन वेगवेगळ्या ठिकाणी फटाके फुटण्याचे हे वैशिष्ट्य असणार आहे.
Success rate of pawar family will come down after this diwali
महत्वाच्या बातम्या
- BJP : पवारांनी केली अजितदादांच्या राष्ट्रवादीची फोडाफोडी, पण भाजपची मित्र पक्षांना उमेदवार पुरवठादारी मोठी!!
- Uddhav Thackeray : पवारांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदात खोडा घातला, तर ठाकरे कशाला सुप्रियांच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा देतील??
- Ayodhya : अयोध्येत दीपोत्सवाद्वारे रचले गेले दोन विश्वविक्रम!