विशेष प्रतिनिधी
पुणे : सध्या रिमेक, सिक्वेल आणि बायोपिकचा भडिमार हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळत आहे. आता यामध्ये भर पडली आहे ती म्हणजे मराठी संगीत नाटकांवर बेतलेल्या चित्रपटांची. ‘कट्यार काळजात घुसली’सारख्या यशस्वी प्रयोगानंतर मराठी अभिनेता सुबोध भावे आता एक नवा प्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. नुकतीच सुबोधने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.Subodh Bhave upcoming new movie
चित्रपट, मालिकाविश्व आणि ओटीटी अशा तीनही मध्यमांत उत्तम आणि दर्जेदार कलाकृती देणाऱ्या सुबोध भावेने नुकतंच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. अजरामर मराठी नाटक ‘संगीत मानापमान’वरुन प्रेरित अशा ‘मानापमान’ या आगामी चित्रपटाची एक छोटीशी झलक सुबोधने शेअर केली आहे. गेली बरीच वर्षं सुबोध भावे या प्रोजेक्टवर काम करत असल्याची चर्चा होती.
आगामी ‘मानापमान’चित्रपटाची झलक शेअर करताना सुबोधने लिहिलं, “शूरा मीं वंदिलें..! जिओ स्टुडीओज् अभिमानाने सादर करत आहे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर नाटकावरून प्रेरित, शंकर-एहसान-लॉय यांची सांगितिक भेट, सुबोध भावे अभिनित – दिग्दर्शित, ‘मानापमान’!” या टीझरमध्ये सुबोधचा एक रांगडा लुक पाहायला मिळाला आहे ज्यात तो तलवारबाजीचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे. शिवाय या चित्रपटाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.
Subodh Bhave upcoming new movie
महत्वाच्या बातम्या
- डीपफेक’ व्हिडीओवर सरकारने बोलावली उच्चस्तरीय बैठक
- राहुल गांधी गाढे अभ्यासू ज्योतिषी आहेत हे समस्त भारतीयांना माहिती नव्हते, ते कालच समजले!!
- ED फुल्ल स्विंग मध्ये, नॅशनल हेराल्ड पाठोपाठ BYJU’S वर कारवाई; 9362.35 कोटी रुपयांसंदर्भात नोटीस!!
- नॅशनल हेरॉल्ड केस मध्ये ED चा गांधी परिवाराला जबरदस्त दणका; तब्बल 751.9 कोटींची मालमत्ता जप्त!!
- निवडणूक असलेल्या 5 राज्यांतून 1760 कोटी रुपयांची दारू आणि रोख जप्त; 2018च्या तुलनेत 7 पट जास्त