• Download App
    मराठा आरक्षणासाठी सरकारच्या हालचालींना वेग, सोमवारी उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक|Sub-committee meeting for Maratha reservation in Ministry on Monday

    मराठा आरक्षणासाठी सरकारच्या हालचालींना वेग, सोमवारी उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक

    मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकच तापताना दिसत आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे, त्यामुळे मराठा समाज बांधव अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या हालचालींनाही वेग आल्याचे दिसत आहे.Important sub-committee meeting on Monday to speed up government’s move for Maratha reservation



    मराठा आरक्षणाबाबत मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी सकाळी १० वाजता मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यामधील मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीकडून ससरकारने माहिती मागवली आहे. आतापर्यंत काय कामे केली, याबाबतचा अहवाल उपसमितीला सादर करायचा आहे.

    राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं, राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी, साखळी उपोषणं सुरू आहेत. याशिवाय मराठा समजातील तरुण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचलत आहेत.दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवर मराठवाड्यातील शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळमध्ये येणार आहेत.

    Sub-committee meeting for Maratha reservation in Ministry on Monday

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!