प्रतिनिधी
मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मुंबईमध्ये धारावीत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायला कोणी भाग पाडले? याची चौकशी करण्याचे आदेश दिले. परंतु पोलिसांच्या लाठीमाराबद्दल मौन बाळगले.Student agitation, police beatings; Now Education Minister Varsha Gaikwad’s call for discussion
महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये दिवसभर झालेल्या आंदोलनानंतर आता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना आणि आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी पाचारण केले आहे. विद्यार्थ्यांनी मुंबई, औरंगाबाद, उस्मानाबाद, जळगाव, अकोला आदी शहरांमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
याबद्दल महाराष्ट्रात महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकारने सकृतदर्शनी हिंदुस्थानी भाऊ या सोशल मीडिया कर्त्यावर ठपका ठेवला आहे. मात्र अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लाठीमार कसा झाला?, लाठीमाराचे आदेश कोणी दिले?, याविषयी मात्र सरकारमधील मंत्र्यांनी मौन पाळले.
आता वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना आणि आंदोलनकर्त्यांना मंत्रालयात येऊन चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय राज्यातील शिक्षण तज्ञांची चर्चा करून घेतला होता. परीक्षा वेळेतच घेणे आणि अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे यावर राज्य शासनाचा भर आहे, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
अर्थात आता आंदोलन झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांनी आणि आंदोलनकर्त्यांनी मंत्रालयात येऊन सरकारशी चर्चा करावी. ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षेबाबत चर्चेतून तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.
Student agitation, police beatings; Now Education Minister Varsha Gaikwad’s call for discussion
महत्त्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवले कोणी?; गृहमंत्री वळसे पाटलांचे चौकशीचे आदेश, पण विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचे काय??
- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांना ट्विटरवर ब्लॉक केले, राज्यपाल मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना धमकावत असल्याचा आरोप
- Economic Survey 2022 ; आव्हानांचा सामना करण्यासाठी अर्थव्यवस्था सज्ज, जाणून घ्या आर्थिक सर्वेक्षणातील मुख्य बाबी
- Budget 2022 : लष्कराने सरकारकडे सुपूर्द केले ‘मागणीपत्र’, पाक-चीनच्या सीमा वादात बजेट किती वाढणार?