• Download App
    राज्यामध्ये मॉन्सूनचे जोरदार आगमन: नऊ जिल्ह्यांत शिडकाव्याने वातावरणात गारवा। Strong monsoon Arrives in the State: Sprinkle in nine Districts

    राज्यामध्ये मॉन्सूनचे जोरदार आगमन: नऊ जिल्ह्यांत शिडकाव्याने वातावरणात गारवा

    वृत्तसंस्था

    पुणे : महाराष्ट्रातील तब्बल 9 जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले आहे.यंदा सरासरीपेक्षा १०१ टक्के जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने या पूर्वीच वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. Strong monsoon Arrives in the State: Sprinkle in nine Districts

    अलिबागमार्गे पुण्यात मान्सूनचं आगमन झाले आहे. सोलापूर मार्गे मॉन्सून तेलंगणा, आंध्र प्रदेशकडे त्याची आगेकूच सुरु आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे.



    मॉन्सूनच्या आगमनामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेतकामाला सुरुवात केली. लवकरच विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल होईल,असे हवामान खात्याने स्पष्ट केले. दरम्यान,चार दिवस लवकर यंदा पुण्यात मान्सून दाखल झाला. तसेच रत्नागिरीरून तो महाराष्ट्रात दाखल झाला आहे. आगामी 24 तासात राज्यातील विविध भागांमध्ये मॉन्सून सक्रिय होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

    Strong monsoon Arrives in the State: Sprinkle in nine Districts

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai Wife Suicide : मुंबईत पतीच्या ब्लॅक मनीला कंटाळून पत्नीची आत्महत्या; आरोपी ‘म्हाडा’चा अधिकारी, काळा पैसा पांढरा करण्याचा होता दबाव

    Khadse Son-in-Law : खडसेंच्या जावयाचे पार्टी प्रकरण; ससूनच्या रिपोर्टमध्ये अल्कोहोलचे सेवन केल्याचे निष्पन्न

    Devendra Fadnavis : संविधानात ‘भारत’ आणि ‘इंडिया’ दोन्ही शब्द; देवेंद्र फडणवीसांनी सरसंघचालकांच्या वक्तव्याचे केले समर्थन