प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : नगरच्या फकीरवाड्यात संदलच्या कार्यक्रमात एमआयएमच्या म्होरक्यांनी औरंगजेबाचे पोस्टर नाचविले. नगरसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटली एमआयएमच्या चार म्होरक्यांविरुद्ध गुन्हे देखील दाखल झाले. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र औरंगजेबाचे पोस्टर दाखविणे हा काय आंदोलनाचा विषय आहे का??, असा सवाल करून तो विषयच डाऊन प्ले करण्याचा प्रयत्न केला. Strict shutdown of Hindu community in Kolhapur
इतकेच नाही तर कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापूरकरांनी कडकडीत बंद पाळला. त्यावर देखील औरंगजेबाचे पोस्टर दाखवल्यामुळे पुण्यात किंवा बाकीच्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी रस्त्यावर उतरणे योग्य नाही, असे वक्तव्य पवारांनी केले.
नगरच्या फकीरवाड्यात औरंगजेब नाचविला; एमआयएमच्या चौघांविरुद्ध गुन्हा, गुन्हेगार फरार; पोलीस शोधात!!
म्हणे, लव्ह जिहादला फाजील महत्त्व नको
लव्ह जिहाद हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्यापेक्षा राज्यात अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लव्ह जिहाद सारख्या मुद्द्यांना मीडियाने फाजील प्राधान्य देऊ नये, अशी शेरेबाजी देखील शरद पवारांनी केली. लव्ह जिहाद विरोधात महाराष्ट्राचा संपूर्ण देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये हिंदू समाज संतप्त झाला आहे. उत्तरकाशी मध्ये लव्ह जिहाद फैलावणाऱ्या दुकानदारांना हिंदू समाजाने धडा शिकवला आहे, तर महाराष्ट्रात संगमनेर मध्ये हिंदू समाजाने कालच प्रचंड मोर्चा काढला होता. तरी देखील शरद पवारांनी लव्ह जिहाद हा प्रश्न गंभीर नाही. त्याला फाजील महत्त्व देऊ नका, असे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज यांच्या विरोधात द्वेष फैलावला जातो आहे. त्यांना संरक्षणाची गरज आहे, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे.
Strict shutdown of Hindu community in Kolhapur
महत्वाच्या बातम्या
- अरबी समुद्रात चक्रीवादळ बिपरजॉयची निर्मिती, उत्तरेकडे कूच, केरळमध्ये पोहोचणाऱ्या मान्सूनच्या ढगांना रोखले
- मोदी दुसऱ्यांदा अमेरिकन काँग्रेसला संबोधित करणार, असे करणारे पहिले भारतीय पंतप्रधान, 2016 मध्ये पहिल्यांदा संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले
- भाजपच्या मागे काँग्रेसची फरफट; पसमांदा मुस्लिमांना पटवण्याची मशक्कत!!
- Delhi AIIMS : हॅकर्सनी पुन्हा एकदा दिल्ली ‘एम्स’ला केले लक्ष्य! रुग्णालयानेच सायबर हल्ल्याची दिली माहिती