विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात भरधाव वेगात पोर्शे कार चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला 15 तासांत जामीन मिळाल्यानंतर संतापाची लाट उसळली. पोलिसांनी चुकीचा तपास केला, पैशांची सेटलमेंट केली असा आरोप झाला. त्या पाठवा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून पोलिसांना या सगळ्या प्रकरणात कठोर कारवाई करायला लावली. फडणवीसांच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी 24 तासात या प्रकरणी 7 जणांना अटक केली. Strict action by Pune Police; Builder Agarwal and 7 people arrested
पुण्यात भरधाव वेगात पोर्शे कार चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यायवसायिक विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या जी.एम प्लाझा लॉजिंग अँड रेस्टॉरंटमधून पुण्याचे उद्योजक विशाल अग्रवाल यांना अटक केली. विशाल अग्रवालसह ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्तीलाही अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचं नाव चत्रभूज डोळस आहे, तर राकेश पौडवाललाही अटक करण्यात आली आहे.
दुसरीकडे अल्पवयीन मुलाला दारू देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांना अटक देखील आली.
विशाल अग्रवाल हे पुण्यातील ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचे प्रमुख आहेत. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहिती असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दलही त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल हे नॉट रीचेबल झाले होते. अखेर त्यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली.
न्यायालयीन चौकशीची मागणी
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे पोलिसांच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारूत पित असल्याचे CCTV फुटेज असून ही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. त्यामुळे पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
Strict action by Pune Police; Builder Agarwal and 7 people arrested
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील 37 मशिदींमधून व्होट जिहादचे फतवे; शिवसेनेची निवडणूक आयोग + पोलिसांमध्ये तक्रार!!
- कन्या प्रेमापोटीच पवारांनी राष्ट्रवादीतल्या ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री केले नाही; अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा आरोप!!
- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ‘या’ दिग्गजांचे भवितव्य पणाला लागणार!
- मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मोठं विधान