• Download App
    वृद्ध दिव्यांग आजींच्या पेन्शन मंजूरीची कहाणी; वाचा देवेंद्रजींच्या शब्दांनी!! Story of pension approval of old disabled grandmothers

    वृद्ध दिव्यांग आजींच्या पेन्शन मंजूरीची कहाणी; वाचा देवेंद्रजींच्या शब्दांनी!!

    प्रतिनिधी

    मुंबई : अनेक गरजू व्यक्ती, तरुण, वृद्ध, महिला हे लोक अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना आपल्या छोट्या मोठ्या कामांसाठी भेटत असतात. काहींची दखल घेतली जाते. अनेकांची दखल घेऊनही त्यांना दाद मिळत नाही. काही अनुभव प्रचंड अस्वस्थ करून जातात, तर काही अनुभव आपल्याला आनंदाची वाऱ्याची झुळूकही अनुभवू देतात. असाच एक अनुभव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आहे. वाचा तो त्यांच्याच शब्दात Story of pension approval of old disabled grandmothers

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :

    31 जानेवारी 2023 ची मंत्रिमंडळ बैठक आटोपल्यानंतर एक दिव्यांग आजी मला भेटल्या. पेन्शन मिळत नाही, एवढेच त्यांनी सांगितले. पेन्शन कशाची हेही ठावूक नव्हते. सोबत दृष्टीबाधित आजोबाही होते. त्यांच्या खिशात फोन होता. पण, नंबरही सांगता येत नव्हता.

    साहेब, आजच्या आज मला पेन्शन मिळालीच पाहिजे, असा आजींचा आग्रह. आजोबा मोठ्या अभिमानाने सांगत होते, आजी आजवर अनेक मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना भेटल्या. पण, काम कुणी करीत नाही. 10 मिनिटांच्या संवादानंतर सुदैवाने त्यांचा अर्ज मिळाला.

    श्रीमती सुनीता आष्टुक असे त्यांचे नाव. रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जिल्हा पुणे!
    मी, तो अर्ज पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना पाठविला आणि त्यांनी तत्काळ उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत कार्यवाही केली. त्यांना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र आज देण्यात आले.

    मला आनंद आहे की, या वृद्ध दिव्यांग दाम्पत्याची सेवा मला करता आली. शेवटच्या माणसाचा विकास हेच ध्येय ठेऊन राजकारणात काम करायचे असते. सर्व अधिकार्‍यांचेही अभिनंदन!

    आजी – आजोबांना त्यांच्या भावी जीवनासाठी अनेक उत्तम शुभेच्छा. त्यांना निरामय आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो…

    #Pune
    #humanity

    Story of pension approval of old disabled grandmothers

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस