• Download App
    STORY BEHIND SAMNA EDITORIAL : रोज बलात्कार -खबरदार महाराष्ट्रात कायदा-सुवस्थेबद्दल बोलाल तर...! असभ्य भाषेत राज्यपालांना धमकी-न्याय मागणार्या महिलांवरही कमेंट । STORY BEHIND SAMNA EDITORIAL: Daily rape - beware if you talk about law and order in Maharashtra ...! Comments on womens who asks for Justice- vulgar language for the governor

    STORY BEHIND SAMNA EDITORIAL : रोज बलात्कार -खबरदार महाराष्ट्रात कायदा-सुवस्थेबद्दल बोलाल तर…! असभ्य भाषेत राज्यपालांना धमकी-न्याय मागणाऱ्या महिलांवरही कमेंट

    राज्यपालांची तळमळ _साकीनाकापासून पुणे, परभणी भिवंडी पर्यंत महिला असुरक्षित आहेत. रोज बलात्काराच्या महाराष्ट्रभरातून बातम्या येत आहेत.


    महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरे पेटतील हे विसरु नका, सामनातून राज्यपाल कोश्यारींना उघड इशारा


    विशेष प्रतिनिधि

    मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी महाराष्ट्रातील महिला सुरक्षा़ या संदर्भात राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. मात्र ठाकरे-पवार सरकारला हे काही रूचले नाही.त्यांना महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील अशी धमकीच देण्यात आली.सामनातून राज्यपालांना असभ्य भाषेत सुनावन्यात आलं.बलात्कार म्हणजे एक घडामोड असही यात नमुद करण्यात आलयं.तसेच महाराष्ट्र सोडून इतर राज्यांचे दाखले देखील देण्यात आले आहेत. STORY BEHIND SAMNA EDITORIAL: Daily rape – beware if you talk about law and order in Maharashtra …! Comments on womens who asks for Justice- vulgar language for the governor

    राज्यपालांची तळमळ

    राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी महाराष्ट्रातील महिला सुरक्षा या विषयावर विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे असे निर्देश देणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. त्यामध्ये राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा त्यांनी घेतला. रोज बलात्कार -महाराष्ट्रात साकीनाका, परभणी, भिवंडी, पुणे येथे बलात्काराच्या आणि हत्येच्या घटना पुढे आल्यात. यावरून राज्यपालांनी ठाकरे – पवार सरकारला विशेष अधिवेशन घेण्याची सूचना केली होती.



    सामना अग्रलेखातून राज्यपाल कोश्यारींना अपशब्द

    महाराष्ट्रातील घडामोडी हा चूड लावण्याचाच प्रकार आहे. अर्थात, महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका.

    महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता वाटते तशी उ.प्रदेश, म. प्रदेशाबाबत का वाटू नये? महाराष्ट्रासह देशातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत एकंदरीत घडामोडी पाहता तेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील भाजपचे महिला महामंडळही महिलांवरील अन्याय-अत्याचाराबाबत इतके आक्रमक आहे की, न्यायासाठी ते राजभवनात ठाण मांडून बसले आहे. महाराष्ट्रातील भाजपचे महिला महामंडळही महिलांवरील अन्याय-अत्याचाराबाबत इतके आक्रमक आहे की, न्यायासाठी ते राजभवनात ठाण मांडून बसले आहे. असे जागरूक महिला महामंडळ मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात नसावे याची खंत कुणास वाटू नये? रेवा जिल्हय़ातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व साकीनाक्यातील घटना यात काय फरक आहे? दोन्ही घटनांत महिलांचेच बळी गेले, पण हंगामा फक्त महाराष्ट्रात होतोय. फरक असा आहे की, महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही व इतर दोन राज्यांत भाजपची सरकारे आहेत.

    न्याय मागणे म्हणजे भांडवल

    महाराष्ट्राच्या विद्यमान राज्यपालांनी इतर राज्यपालांना खडे बोल सुनवायला हवेत व साकीनाक्यातील घटनेचे भांडवल करून महाराष्ट्रात जसे विशेष विधानसभा सत्र बोलावण्याचे येथील मुख्यमंत्र्यांना सुचवले तसे कार्य इतर राज्यपालांनीही करावे, असा आग्रह धरावा. म्हणजे संपूर्ण देशातील हजारो अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळेल.

    राज्यपाल म्हणजे पांढरा हत्ती

    राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत. दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षांची सरकारे ज्या राज्यांमध्ये नाहीत त्या राज्यांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच ‘रोल’ अदा करतात .

    गेल्या दीड वर्षापासून महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल यांच्यात या ना त्या कारणावरुन सातत्याने संघर्ष होताना दिसून येत आहे.राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये लेटर वॉर रंगलं.

    STORY BEHIND SAMNA EDITORIAL: Daily rape – beware if you talk about law and order in Maharashtra …! Comments on womens who asks for Justice- vulgar language for the governor

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ