• Download App
    Voting या मतदारसघांत झालेले तुफानी मतदान कोणाला देणार फटका

    Voting : या मतदारसघांत झालेले तुफानी मतदान कोणाला देणार फटका

    Voting

    विशेष प्रतिनिधी

    Voting  राज्यात विधानसभा निवडणुकीत 65 टक्क्यांवर मतदान झाले आहे. पंधरा मतदारसंघ असे आहेत की तेथे तुफानी म्हणावे असे मतदान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात तर सर्वाधिक 84.79 टक्के मतदान झाले. अनेक जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.Voting

    तर आपण आता बघू कोणत्या मतदारसंघात किती मतदान आहे आणि तेथे लढत कशी होणार आहे.

    करवीर मतदारसंघात 84.79टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी ही जागा काँग्रेसने जिंकली होती. दिवंगत पी एन पाटील सडोलीकर आमदार होते. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र आणि काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घालत प्रचाराचा मुद्दा हाताळला आहे. दुसरीकडे मतदारसंघातील विकास कामाची शिदोरी घेत महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मतदारापर्यंत पोहचले आहेत. करवीरचे मतदार भावनिकतेला की विकासाला महत्व देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.



    चिमुर मतदारसंघात 81.75 टक्के मतदान झाले आहे.भाजपचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया विरुद्ध काँग्रेसचे डॉ. सतीश वारजूकर यांच्यात थेट लढत होणार आहे.

    कागल मधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. येथील चुरशीचे प्रतिबिंब मतदानात पडले आहे. 81.72 टक्के मतदान झाले आहे.

    ब्रह्मपुरी मतदारसंघात 80.54 टक्के मतदान झाले आहे. याठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लढत आहेतगेली दोन टर्म वडेट्टीवार ब्रह्मपुरीचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि आता तिसऱ्यांदा रिंगणात उतरून हॅटट्रिकसाठी सज्ज झाले आहेत. वडेट्टीवार यांच्यासमोर भाजपने कृष्णलाल सहारे हा कुणबी समाजातील उमेदवार दिला. येथे काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत आहे.

    कृषि मंत्री अब्दुल सत्तार लढत असलेल्या सिल्लोड मतदारसंघात 80 टक्के मतदान झाले आहे. भाजपमधून शिवसेनेत आलेले सुरेश बनकर यांच्या विरोधात लढत आहे.

    नेवासा मतदारसंघात 79.89 टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्ष नावाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवणारे माजी मंत्रीशंकरराव गडाख पुन्हा आमदार झाले होते. गडाख यांना या वेळी महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार म्हणून तिकिट दिलं आहे. ते शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे शिंदे गटाकडून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उतरले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे बच्चू कडू यांच्या जनशक्ती प्रहार पक्षाकडून लढत आहेत.

    शाहूवाडी महायुतीकडून जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे विरुद्ध महाविकास आघाडी ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर यांच्यात सामना रंगला आहे. चुरशीची निवडणूक झाल्याचे 79.04 टक्के मतदानवारून वाटत आहे.

    पलूस कडेगाव मतदारसंघात 79.02 टक्के मतदान झाले आहे. निवडणूक एकतर्फी होणार, असा काँग्रेसचा होरा होता. पण ही निवडणूक चुरशीची होत असल्याचे वाढलेल्या मतदाराहून दिसत आहे. कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांच्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांपासून आजी-माजी खासदार यांच्या सभा होत आहेत. तर संग्रामसिंग देशमुख यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत.गेल्या निवडणुकीत युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे होती. विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले. तसेच, विरोधकांपेक्षा नोटाला जादा मते मिळाली. त्यामुळे डॉ. विश्वजित कदम यांनी ही निवडणूक एकतर्फी व उच्चांकी फरकाने जिंकली होते. यावेळी मात्र ही जागा भाजपकडे गेल्याने पारंपरिक प्रतिस्पर्धी कदम व देशमुख अशी सरळ लढत होत आहे.

    Stormy Voting in This Constituency: Who Will Face the Blow?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस