• Download App
    सतत भाषणे करून पवारांचा बसला घसा; तरीही इंदापूरच्या सभेत दत्तामामा भरणेंना दिला इशारा!! Stop Pawar's making continuous speeches; Still Dattamama Bharane was warned in the meeting of Indapur!!

    सतत भाषणे करून पवारांचा बसला घसा; तरीही इंदापूरच्या सभेत दत्तामामा भरणेंना दिला इशारा!!

    विशेष प्रतिनिधी

    इंदापूर : बारामतीसह फक्त 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवारांचा प्रचार करून, त्यांच्या प्रचार सभांमध्ये सतत भाषणे करून शरद पवारांचा घसा बसला. उन्हाळा आहे, जरा सांभाळून घ्या. सतत भाषणे करण्याचा परिणाम माझ्या घशावर झाला. त्यामुळे माझा घसा बसला, असे शरद पवार इंदापूरच्या सभेत म्हणाले. या सभेतच त्यांनी दत्तामामा भरणे यांना शेतीचे पाणी तुमच्या बापजाद्याचे नाही, असा इशारा दिला. Stop Pawar’s making continuous speeches; Still Dattamama Bharane was warned in the meeting of Indapur!!


    देवेंद्र फडणवीस “मुख्यमंत्री”!!; चूक झाली “चुकून” की दत्तामामा मनातलं गेले बोलून??


    शरद पवार गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये कितीतरी भाषणे करत होते पण त्यांचा घसा बसल्याचे उदाहरण दुर्मिळ होते. तशा बातम्या कधी आल्या नव्हत्या. शरद पवार त्यांच्या राजकीय आयुष्यात सर्वात कमी जागांवर म्हणजे लोकसभेच्या फक्त 10 जागांवर निवडणूक लढवत आहेत. या आधीच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांनी किमान 20 ते 22 लोकसभेच्या जागांवर आणि 100 पेक्षा अधिक विधानसभांच्या जागांवर त्यांच्या पक्षाने निवडणुका लढविल्या. त्यावेळी ते महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरले. शेकडो प्रचार सभांमध्ये त्यांनी भाषणे केली. परंतु, त्यांचा घसा बसल्याची उदाहरणे आढळली नव्हती. मात्र, आता पवारांचा वयाचा परिणाम त्यांच्या घशावर दिसू लागला आहे. फक्त 10 – 12 लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार करून पवारांचा घसा बसल्याचे आढळून आले आहे. ही माहिती त्यांनी स्वतःच इंदापूरच्या सभेत दिली.

    विरोधकांना मदत कराल, तर शेतीचे पाणी तोडू, अशा धमक्या दत्तामामा भरणे यांनी दिल्या. यास दत्तामामाला मी आमदार केले. राज्यात मंत्री केले आणि आता तेच इंदापूरच्या मतदारांना धमक्या देत असतील, तर ते सहन करणार नाही. शेतीचे पाणी कोणाच्या बापजाद्याचे नाही, असा इशारा पवारांनी दिला.

    Stop Pawar’s making continuous speeches; Still Dattamama Bharane was warned in the meeting of Indapur!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस