• Download App
    दगड, चप्पल फेक : पोलिसांनी सिल्वर ओक पासून एसटी कर्मचाऱ्यांना हटवल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया; चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही!! |Stones, sandals thrown: Pawar's reaction after police removed ST workers from Silver Oak; Not backing the wrong leadership

    दगड, चप्पल फेक : पोलिसांनी सिल्वर ओक पासून एसटी कर्मचाऱ्यांना हटवल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया; चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही!!

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरापाशी सिल्वर ओक परिसरात दगडफेक आणि चप्पल फेक नाट्य घडल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. संतप्त एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी सिल्वर ओक पासून दूर केल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे.Stones, sandals thrown: Pawar’s reaction after police removed ST workers from Silver Oak; Not backing the wrong leadership

    आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. परंतु, चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांचा रोख अर्थातच गुणरत्न सरवदे या एसटी कर्मचाऱ्यांच्या वकिलांकडे तसेच भाजपकडे असल्याचे मानण्यात येत आहे.



    आज दुपारी एसटी कर्मचारी अचानक सिल्वर ओकपाशी पोहोचून त्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पल फेक केली. सुमारे अर्धा-पाऊण तास दगडफेक आणि चप्पल फेकीचे नाट्य सुरू होते. त्यानंतर सुप्रिया सुळे तेथे पोहोचल्यावर. त्यांनी हात जोडून एसटी कर्मचाऱ्यांना शांत राहण्याची विनंती केली. आपली शांततेत चर्चा करण्याची तयारी दाखवली. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांना भावना आवरल्या नाहीत. या सर्व प्रकरणाला राजकीय वळण लागले. एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी सिल्वर ओक पासून दूर करून बसमध्ये बसवून आझाद मैदानावर पाठवून दिले.

    याच दरम्यान तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर शरद पवार आले आणि त्यांनी आपली भूमिका मांडली. आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. परंतु, चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या समर्थनासाठी पुणे-मुंबई आणि अन्य काही शहरांमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

    Stones, sandals thrown: Pawar’s reaction after police removed ST workers from Silver Oak; Not backing the wrong leadership

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस