• Download App
    सिल्वर ओक वर दगडफेक : मराठी माध्यमांचा गृह मंत्रालय, मुंबई पोलिस, गुप्तचर यंत्रणेवर अपयशाचा ठपका!! Stone throwing on Silver Oak

    सिल्वर ओक वर दगडफेक : मराठी माध्यमांचा गृह मंत्रालय, मुंबई पोलिस, गुप्तचर यंत्रणेवर अपयशाचा ठपका!!

    प्रतिनिधी

    मुंबई : संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांचे निवासस्थान असणारे सिल्वर ओक वर दगडफेक आणि चप्पल फेक केली. आंदोलन प्रचंड भडकले होते. सुमारे अर्धा-पाऊण तास या 150 ते 200 आंदोलकांनी शरद पवारांच्या घराबाहेर प्रचंड घोषणाबाजी केली. सुप्रिया सुळे यांनी सिल्वर ओकच्या बाहेर येऊन वारंवार हात जोडून विनंती केली. परंतु आंदोलन ऐकायला तयार नव्हते. या पार्श्वभूमीवर मराठी प्रसार माध्यमांनी महाराष्ट्राचे गृहमंत्रालय, मुंबई पोलीस आणि मुंबई पोलिसांची गुप्तचर यंत्रणा यावर अपयशाचा ठपका ठेवला आहे. Stone throwing on Silver Oak

    150 ते 200 पेक्षा जास्त आंदोलक अचानक शरद पवारांचा घरापाशी जमतात. ते धावत – पळत जाऊन दगडफेक आणि चप्पल फेक करतात याची पोलिसांना माहिती कशी मिळाली नाही?? यामध्ये प्लॅनिंग असताना याबद्दलची माहिती मुंबई पोलिस गृहमंत्रालयाच्या गुप्तचर यंत्रणा यांना कशी मिळाली नाही असे सवाल आता मराठी प्रसार माध्यमे उपस्थित करू लागली आहेत.



    खुद्द सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार स्वतः शरद पवार यांच्या पत्नी सौ. प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांची कन्या हे घरात उपस्थित होते. अशा स्थितीत सिल्वर ओकपाशी पोलीस बंदोबस्त कसा नव्हता??, याबद्दलही मोठ्याप्रमाणावर शंका मराठी माध्यम व्यक्त करताना दिसत आहेत.

    संतप्त एसटी कर्मचाऱ्यांबद्दल त्यांच्या मागणीबद्दल मराठी माध्यमे सध्या तरी काही बोलत नाही. मात्र, शरद पवार यांच्या घरावर तेव्हा संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक केली आणि चप्पल फेक केली. त्यानंतर मराठी माध्यमांना हे घडले कसे??, यामध्ये गृह मंत्रालय, मुंबई पोलीस आणि पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणांचे अपयश दिसायला लागले आहे.

    Stone throwing on Silver Oak

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!