• Download App
    दगड - चप्पल फेक : सिल्वर ओकपाशी आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हाकलण्याच्या हालचाली!!| Stone - Slipper throw: Movements to evict ST workers from Azad Maidan after agitation with Silver Okpa

    दगड – चप्पल फेक : सिल्वर ओकपाशी आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हाकलण्याच्या हालचाली!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एसटीच्या संतप्त कर्मचाऱ्यांनी शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकपाशी आंदोलन केले. दगडफेक केली. चप्पल फेकल्या. आता पोलिसांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. Stone – Slipper throw: Movements to evict ST workers from Azad Maidan after agitation with Silver Okpa

    आझाद मैदानावर पोलिसांनी प्रचंड फौजफाटा वाढवला असून पोलिसांनी मैदानात संचलन देखील गेले आहे. पोलिसांचे अधिकारी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची चर्चा करत असून एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने आझाद मैदान सोडावे यासाठी प्रयत्न करत आहेत.



    अवघ्या दोन – तीन तासांमध्ये हे सगळे नाट्य घडले आहे. एसटी कर्मचारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकपाशी पोहोचले. तिथे त्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक केली. त्यानंतर महाराष्ट्रात मोठे राजकीय नाट्य सुरू झाले आहे.

    या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने ऍक्‍शनमध्ये येऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. त्याच वेळी आझाद मैदानात मोठा पोलिस फौजफाटा जमून एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. आम्ही आमचे वकील गुणरत्न सरवदे यांचे ऐकू. त्यांनी सांगितले तर आझाद मैदानाच्या बाहेर जाऊ अन्यथा आझाद मैदानातच थांबू, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

    मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी आता सामोपचाराने हा प्रश्न मिटवण्यासाठी तातडीने आझाद मैदान सोडावे असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी सिल्वर ओक बाहेर जमलेल्या राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांसमोर केले आहे. शरद पवारांचा रोख गुणरत्न सरवदे यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर संपकरी आंदोलन कर्ते एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढण्याच्या जोरदार हालचाली सुरू असून पोलिसांनी मैदानावर प्रचंड पाऊस फाटा जमवला आहे.

    Stone – Slipper throw: Movements to evict ST workers from Azad Maidan after agitation with Silver Okpa

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!