वृत्तसंस्था
पुणे: मावळमध्ये मुसळधार पाऊस पडत असून आज दुपारच्या सुमारास कार्ला आणि लोणावळा परिसरातही जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे डोंगर भागातून पाण्याचे मोठे लोट वाहू लागल्याने कार्ला एकविरा देवीच्या डोंगरावर सैल झालेले काही दगड पाण्यासोबत घरंगळत खाली आले. अतिशय वेगाने हे दगड खाली येऊन पडले आहेत. हे दगड पडताना जोराचे आवाज ऐकू येत होते. stone slide on Ekvira fort; Fortunately no one was injured
कार्ला लेणी नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली आहेत. पर्यटकांची रोज येथे गर्दी होते. पण,आज या परिसरात कोणी नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. दोन महिन्यांपूर्वी डोंगरावरून तुटलेल्या भिंतीचे दगड मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेत पडले होते.
डागडुजी करा अन्यथा आंदोलन करू
यावर्षी दगड घरंगळून पडण्याची ही दुसरी मोठी घटना आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी कार्ला गड पायथा येथील नागरिकांनी पुरातत्व खात्याशी पत्रव्यवहार केला आहे. आठवड्यात खात्याने लेणी, गडाची डागडुजी नाही केली, तर आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
stone slide on Ekvira fort; Fortunately no one was injured
महत्त्वाच्या बातम्या
- नेहरू – वाजपेयींकडे काश्मीरसाठी स्वतंत्र दृष्टी होती; मोदी सरकार हिंदू- मुस्लिमांमध्ये फूट पाडतेय; मेहबूबांचा वार
- अनियमित हवामान असूनही भारताचा खरीप हंगामात विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज, 150.50 दशलक्ष टन उत्पादनाची अपेक्षा
- टेक्सटाइल कंपनीवर प्राप्तिकर विभागाचा छापा, तब्बल 350 कोटी रुपयांचा काळा पैसा उघड
- Narendra Giri Suicide Note : महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट आली समोर, मुलींसह फोटो व्हायरल करण्याची शिष्य आनंद गिरीची धमकी