विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज जोरदार राडा झाला. बीड मधल्या शाहू नगर भागात पवार काका – पुतण्याचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांनी तुफान दगडफेक करून नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदानात अडथळा निर्माण केला. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. Beed
– जयंत पाटलांचे टीकास्त्र
राज्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये नंगा नाच सुरू आहे. ज्याच्या हातात पैसा आहे, तो पैसा वाटतोय. रिक्षा, ऑफिस, बुथवर पैसे वाटप सुरू आहे. अनेक लोक बोगस मतदान करून जाताहेत. पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष नाही, असे टीकास्त्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सोडले. पण बीड मधल्या राड्यावर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
– महाडमध्ये तुफान राडा
महाडमध्ये शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक आणि सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरच्या गाड्या फोडल्या. भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले याला दाखवल्याचा आरोप झाला. सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलेल्या सुशांत जबरे यांच्या गाडीची तोडफोड झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पुढचा राडा टाळला.
– संजय राऊत यांची पोस्ट
शिंदे मालवणात आले
येताना बॅगेतून काय आणले?
मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर!
या आधी नाशिक मध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या
लोकशाही ची ऐशी की तैशी?
जय महाराष्ट्र!
– संतोष बांगरांवर गुन्हा
कळमनुरी मध्ये प्रत्यक्ष मतदान बुथ मध्ये जाऊन मोबाईल वापरून महिलेला मतदानासंदर्भात कथित मार्गदर्शन केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला. मतदान गोपनीय असताना मतदान केंद्रावर महिलेला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे बटन कसे दाबायचे, याचे मार्गदर्शन संतोष बांगर यांनी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात चौकशी करून गोपनीयतेचा भंग केल्याच्या कायद्याचे कलम लावून संतोष बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Stone pelting in Beed!!
महत्वाच्या बातम्या
- म्हणे, मराठी माणूस पंतप्रधान!!, पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्याला सुद्धा का सोडावीशी वाटली पुडी??
- Rahul Gandhi : कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा खुलासा- राहुल गांधींनी मंत्री हटवण्यासाठी दबाव टाकला, बरखास्त न केल्यास ट्विटचा इशारा दिला
- Germany, : जर्मनीमध्ये AfD पक्षाच्या युवा शाखेचा विरोध, 25 हजार लोक निदर्शनासाठी पोहोचले
- निवडणूक स्थगित करण्यावर फडणवीसांचा आक्षेप; रवींद्र चव्हाणांचे निवडणूक आयोगाला पत्र