प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक वर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक केली. या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात घुसून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.Stone on Silver Oak – Slipper throw: ST workers’ lawyer Gunaratna Sadavarten was arrested by the police after breaking into his house
एसटी कर्मचाऱ्यांच्या दगडफेक आणि चप्पल फेकीनंतर महाराष्ट्रात राजकारण पेटले असून या आंदोलना मागच्या मास्टर माईंड शोधून काढण्याचे आव्हान आम्ही पेलू, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
यानंतरच पोलीस ॲक्शन मध्ये आले असून त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. आपल्या जीवाला शरद पवार यांच्यामुळे धोका आहे, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. पोलिसांनी मला बेकायदेशीर रित्या अटक केली आहे.
माझ्या विरुद्ध एफआयआर दाखल झालेला नाही किंवा दाखल झाला असल्यास त्यांनी मला दाखवलेला नाही. त्याचबरोबर माझ्या जीवाला धोका उत्पन्न झाला तर त्यासाठी दिलीप वळसे-पाटील यांना जबाबदार धरा, असे गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस गाडीत बसताना सांगितले.
जयश्री पाटील यांचा गंभीर आरोप
गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी देखील शरद पवारांवर आरोप करत त्यांच्यापासून आपल्या पतीच्या जीवाला धोका असल्याचे वक्तव्य केले आहे. रात्री उशिरापर्यंत गुणरत्न सदावर्ते यांना अटक होऊ शकते, असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले आहे. सदावर्ते यांच्या अटकेनंतर एसटी कामगारांच्या आंदोलनाला आणखी वेगळेच वळण लागले असून वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याचे पडसाद उमटण्याची दिसून येत आहे.
Stone on Silver Oak – Slipper throw: ST workers’ lawyer Gunaratna Sadavarten was arrested by the police after breaking into his house
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई यांचे निधन
- सिल्वर ओक वर चप्पल फेक : सुप्रिया सुळे शाहरुख खानच्या मुलाचा आई बनल्या, पण एसटी कर्मचाऱ्यांच्या बहीण नाही बनल्या; महिलांचा आक्रोश!!
- वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचे आमिषाने तब्बल १३ जणांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक
- Sharad Pawar : शरद पवारांविरुद्ध असंतोष, आंदोलन नवे नाही; कांदा फेक, थप्पड आणि चप्पल फेक!!