• Download App
    जाती-धर्माचे दगड फेकण्यासाठी नसतात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा तिखट प्रहार|Stone of caste-religion Not to be thrown away

    WATCH : जाती-धर्माचे दगड फेकण्यासाठी नसतात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा तिखट प्रहार

    विशेष प्रतिनिधी

    सांगली – डोकं रिकाम असलेल्या हातांमध्ये दगड दिला तर तो दगड भिरकावला जातो, असे परखड मत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या जातीय दंगलीवरून कोल्हे यांनी परखड मत व्यक्त केले. सांगलीतील आयोजित किल्ले स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.Stone of caste-religion Not to be thrown away

    ते म्हणाले, इतिहास डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नाही ती डोक्यात भिनवून घेण्याची आहे. डोक्यात जर छत्रपतींचा इतिहास असेल तर तो दगड भिरकावला जात नाही तर तो विधायक कामासाठी रचला जातो.



    डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवरायांचा इतिहास आता शालेय विद्यार्थ्यांना शिकायला मिळत नाही.इतिहास विद्यार्थ्यांना समजावण्यासाठी उपक्रम राबविले पाहिजे. टिव्ही सिरियल, पुस्तके यांसह अनेक माध्यमातून शिवरायांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून त्यांना माहिती दिली पाहिजे. अन्यथा भावी पिढीला शिवरायांचा इतिहास माहीत नसेल.

    •  जाती-धर्माचे दगड फेकण्यासाठी नसतात
    • डोक रिकामे असलेले दगड भिरकावतात
    • दगड विधायक कामासाठी वापरावा
    •  इतिहास डोक्यात भिनवून घेण्याची गरज आहे
    •  शिवरायांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावा

    Stone of caste-religion Not to be thrown away

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा