विशेष प्रतिनिधी
सांगली – डोकं रिकाम असलेल्या हातांमध्ये दगड दिला तर तो दगड भिरकावला जातो, असे परखड मत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या जातीय दंगलीवरून कोल्हे यांनी परखड मत व्यक्त केले. सांगलीतील आयोजित किल्ले स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.Stone of caste-religion Not to be thrown away
ते म्हणाले, इतिहास डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नाही ती डोक्यात भिनवून घेण्याची आहे. डोक्यात जर छत्रपतींचा इतिहास असेल तर तो दगड भिरकावला जात नाही तर तो विधायक कामासाठी रचला जातो.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवरायांचा इतिहास आता शालेय विद्यार्थ्यांना शिकायला मिळत नाही.इतिहास विद्यार्थ्यांना समजावण्यासाठी उपक्रम राबविले पाहिजे. टिव्ही सिरियल, पुस्तके यांसह अनेक माध्यमातून शिवरायांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून त्यांना माहिती दिली पाहिजे. अन्यथा भावी पिढीला शिवरायांचा इतिहास माहीत नसेल.
- जाती-धर्माचे दगड फेकण्यासाठी नसतात
- डोक रिकामे असलेले दगड भिरकावतात
- दगड विधायक कामासाठी वापरावा
- इतिहास डोक्यात भिनवून घेण्याची गरज आहे
- शिवरायांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावा