विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेअर बाजारातील तेजीने गेल्या तीन सत्रांत जोर धरल्याने ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ या दोन्ही निर्देशांकांनी उसळी मारली. मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य २१६.४४ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढल्याने शेअर गुंतवणूकदार आज सुमारे २.८ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले.Stock market Zoom up, sensex crossed 50 K mark
थोडक्यात, त्यांच्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढले. गेल्या तीन सत्रांत हा निर्देशांक १५०० हून अधिक अंशांनी वाढला आहे.
सेन्सेक्सने पुन्हा ५० हजारांचा टप्पा पार केला.
सेन्सेक्स व निफ्टी आज सव्वा टक्का वाढले. आजच्या कामकाजात ‘निफ्टी’ने १५,१०० ची पातळी ओलांडली. त्याचबरोबर ‘सेन्सेक्स’ही ६१३ अंशांनी वाढून ५०,१९३ च्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर ‘निफ्टी’ १८५ अंशांनी वधारून १५,१०८ च्या पातळीवर बंद झाला.
निर्देशांक आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी दाखवत बंद झाले. आज व्यवहारांना सुरुवात झाल्यावर सेन्सेक्स बहुतांश वेळ ५० हजारांच्या वरच होता. दिवसअखेर तो ६१२ अंशांनी वाढून ५०,१९३ अंशांवर बंद झाला; तर १८४ अंशांनी वाढलेला निफ्टी १५,१०८ अंशांवर स्थिरावला.
Stock market Zoom up, sensex crossed 50 K mark