• Download App
    Step to strengthen claim on original Shiv Sena; Youth Sena Executive of Shinde group announced

    मूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा विषय सुप्रीम कोर्टात आणि केंद्रीय निवडणूक आयोगात प्रलंबित असताना शिवसेनेच्या मूळ संघटनेवरचा आपला दावा मजबूत करण्यासाठी शिंदे गटाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शिवसेनेच्या युवा सेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. Step to strengthen claim on original Shiv Sena; Youth Sena Executive of Shinde group announced

    शिवसेनेचे धनुष्यबाण नक्की कुणाचे, हा विषय आत निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आले आहे. मात्र आयोग यासाठी शिवसेनेत संसदीय, विधीमंडळ आणि संघटनात्मक उभी फूट पडली आहे का?, याची खात्री करून घेणार आणि मगच शिवसेना चिन्ह उद्धव गटाचे राहणार कि शिंदे गटाला देणार याचा निर्णय देणार आहे. त्यामुळे शिंदे गटही कामाला लागला आहे. शिंदे गटाने आता युवा सेनेला “लक्ष्य” केले आहे. युवा सेनेची कार्यकारिणी शिंदे गटाने जाहीर केली आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्वात आधी शिवसेनेचे ५५ पैकी ४० आमदार आले, यानंतर १२ खासदारांनीही शिंदेंची साथ दिली, तसेच शिवसेनेचे काही पदाधिकारीही शिंदे गटात गेले, यानंतर आता त्यांनी युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केली आहे. यातून शिवसेना संघटनेत उभी फूट पडल्याचे दाखवून बहुसंख्या शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे कार्यकर्ते अर्थात शिवसैनिक पदाधिकारी आपल्याच बाजूला असल्याचे शिंदे गट निवडणूक आयोगापुढे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे.

     शिंदे गटाच्या युवासेनेची अशी असणार कार्यकारिणी

    उत्तर महाराष्ट्र : अविष्कार भुसे

    मराठवाडा : अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील

    रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग : विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे

    पश्चिम महाराष्ट्र : किरण साली, सचिन बांगर

    कल्याण भिवंडी : दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक

    ठाणे, नवी मुंबई व पालघर : नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे

    मुंबई : समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे

    Step to strengthen claim on original Shiv Sena; Youth Sena Executive of Shinde group announced

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!