विशेष प्रतिनिधी
नाशिक : काँग्रेसने मला मुख्यमंत्रीपद देऊ केले होते, पण मी शरद पवारांसमवेत राहिलो आणि खात्रीने मिळणारे मुख्यमंत्रीपद गमावले, अशा शब्दांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपली खंत बोलून दाखवली. Stayed with Pawar and lost the guaranteed Chief Ministership offered by the Congress
शरद पवारांनी आज लोकसत्ताला मुलाखत देऊन आपण पंतप्रधानपद कसे गमावले, आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिला नाही??, या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामध्ये त्यांनी छगन भुजबळांचे नाव घेऊन त्यांना मुख्यमंत्री केले असते, तर राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हाच फुटली असती, असा दावा केला पवारांच्या या दाव्यावर छगन भुजबळ यांनी उत्तर दिले.
छगन भुजबळ म्हणाले :
१९९१ साली शिवसेना सोडून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजप शिवसेनेच्या विरोधात काम केले म्हणून अनेक वेळा माझ्यावर जीवघेणे हल्ले झाले होते. १९९५ मध्ये युती सरकार आले. मला पवारांनी विधान परिषदेतून आमदार केले. विरोधी पक्षनेता केले. त्यानंतर १९९९ मध्ये काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मी शरद पवार यांच्यासोबत गेलो. त्यावेळी काँग्रेसने मला शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये. तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ, असेही सांगितले. परंतु मी पवार साहेबांची साथ दिली. त्यावेळी मी पवार साहेबांबरोबर गेलो नसतो, तर काँग्रेसकडून मुख्यमंत्री झालो असतो.
२००४ मध्ये आम्हाला जास्त जागा असल्याने काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद देण्याची तयार होती. आम्ही तयार होतो पण पवार साहेबच बोलायला तयार नव्हते ते कोणाचे नावच घेत नव्हते. त्यांना नेमकी काय अडचण होती ती मला माहिती नाही.
नशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरीची जागेवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नंतर सभेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांना प्रचंड मोठी गर्दी होती.
Stayed with Pawar and lost the guaranteed Chief Ministership offered by the Congress
महत्वाच्या बातम्या
- अधीर रंजन चौधरी बंगालमध्ये लढवताहेत काँग्रेसचा उरलेला बालेकिल्ला, पण खर्गेंनी मुंबईतून त्यांनाच दम दिला!!
- कष्टाला नाही कमी, यशाची हमी : 52 दिवस : 115 सभा, माध्यमांना 67 मुलाखती; फडणवीसांचा झंझावात!!
- संघ आणि भाजप कार्यक्षेत्रे वेगळी, पण विचारप्रणाली एकच “राष्ट्र प्रथम”; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांची स्पष्टोक्ती!!
- अफगाणिस्तानात पुराचा कहर, 70 ठार, अनेकजण बेपत्ता!