• Download App
    विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अधिवेशन संपेपर्यंत निलंबित State president of NCP Jayant Patil suspended till the end of session

    विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अधिवेशन संपेपर्यंत निलंबित

    प्रतिनिधी

    नागपूर : विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याच्या संतापात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल असंसदीय शब्द वापरल्याबद्दल त्यांच्यावर विधिमंडळ अधिवेशन काळाच्या अखेरपर्यंत निलंबनाची कारवाई विधानसभेने मंजूर केली आहे. State president of NCP Jayant Patil suspended till the end of session

    सत्ताधारी आघाडीतील 14 लोकांना आमदारांना बोलण्याची संधी देता विरोधकांपैकी एकाला तरी संधी न देण्याचा निर्लज्जपणा करू नका, असे वक्तव्य जयंत पाटलांनी केले होते. विधानसभा अध्यक्षांविषयी हे अपशब्द वापरल्याबद्दल जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी करणारा ठराव सत्ताधारी आघाडीच्या वतीने विधिमंडळ कामकाज मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडला. तो बहुमताने विधानसभेने मंजूर केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जयंत पाटलांचे अधिवेशन काळापुरते निलंबन केले.



    निलंबनाची कारवाई केल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सदनाची दिलगिरी व्यक्त करून सर्व विरोधकांसह सभात्याग केला. सत्ताधारी बाकांवरुन जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आता अध्यक्षांकडून हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.

    State president of NCP Jayant Patil suspended till the end of session

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस