• Download App
    गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या धरती देवरे धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध|State President of Gujarat BJP C. R. Patil's daughter Dharti Devare Dhule Zilla Parishad president unopposed

    गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या धरती देवरे धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध

    प्रतिनिधी 

    धुळे : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा नवसारीचे खासदार सी. आर. पाटील यांच्या कन्या आणि धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे यांची स्नुषा धरती देवरे यांची धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीत धरती देवरे यांच्या नावावर एकमत झाले. अश्विनी पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.State President of Gujarat BJP C. R. Patil’s daughter Dharti Devare Dhule Zilla Parishad president unopposed

    मूळचे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्याचे रहिवासी असलेले सी. आर. पाटील हे गुजरातमधील नवसारीचे खासदार असून गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्षही आहेत. गुजरातमध्ये मोदी-शहा यांचे निकटवतीय म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यामुळे धुळ्यात सुभाष देवरे यांची सून म्हणून आलेल्या त्यांच्या कन्येला लवकरच पद मिळेल, असे सांगण्यात येत होते.



    आमदार अमरीश पटेल, आमदार झालेल्या जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्यात आला. स्थानिक पातळीवर
    राजकीय रस्सीखेच असली तरी सी. आर. यांच्या कन्येचे नाव समोर आल्यानंतर त्यावर एकमत होऊन विरोधकांनीही पाठिंबा दिला, अशी दुर्मिळ घटना पाहण्यास मिळाली.

    धरती देवरे यांचे सासरे सुभाष देवरे हे काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे शालक आहेत. त्यांनीदेखील धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. धरती देवरे यांचे आजेसासरे शिवाजी रायमल देवरे यांनीदेखील जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले होते. एकाच कुटुंबातील सलग तिसरी पिढी या पदावर पोहोचली आहे.

    दुसरी मुलगीही आमदारकीच्या स्पर्धेत

    सी. आर. पाटील यांची दुसरी कन्या भाविनी पाटील या जामनेर तालुक्यातील मोहाडी गावच्या ग्रामपंचायत सदस्या आहेत. त्यांनी पाच वर्षे मोहाडी गावचे सरपंचपदही सांभाळले होते. दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्या पॅनलचा पराभव झाला; परंतु त्या स्वतः सदस्य म्हणून निवडून आल्या. या वेळी राजकीय बदल झाल्यास जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

    State President of Gujarat BJP C. R. Patil’s daughter Dharti Devare Dhule Zilla Parishad president unopposed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस