Wednesday, 7 May 2025
  • Download App
    काँग्रेस - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडायला फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचं नाही हे ठरलेलं - हसन मुश्रीफ । State Minister Hasan Mushrif Criticizes BJP Over MLA Pratap Sarnaik Letter To CM Thackeray in Kolhapur

    काँग्रेस – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडायला फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलेलं – हसन मुश्रीफ

    State Minister Hasan Mushrif Criticizes BJP Over MLA Pratap Sarnaik Letter To CM Thackeray in Kolhapur

    शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र हीसुद्धा भाजपची चाल आहे, असा आरोप ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रताप सरनाईकांच्या पत्रावरून महाविकास आघाडीमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी बोलत असल्याचंही ते म्हणाले. State Minister Hasan Mushrif Criticizes BJP Over MLA Pratap Sarnaik Letter To CM Thackeray in Kolhapur


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र हीसुद्धा भाजपची चाल आहे, असा आरोप ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रताप सरनाईकांच्या पत्रावरून महाविकास आघाडीमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी बोलत असल्याचंही ते म्हणाले.

    सरनाईकांचं पत्र ही भाजपचीच चाल

    राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत असल्याचा आरोप प्रताप सरनाईकांनी केला. त्यावर मुश्रीफ म्हणाले की, “सरनाईकांनी असा आरोप केला असला तरी राज्यात कुठेही तशी परिस्थिती नाही. कोल्हापूर जिल्हा परिषद, गोकुळमध्ये शिवसेनेला संधी दिली. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नावरून कुरबुरी झाल्या असतील याचा अर्थ फोडाफोडी चालली आहे असा नाही. प्रताप सरनाईक यांचं हे कारण जुजबी असावं. भाजपकडून सुडाचं राजकारण सुरू आहे. शिवसेनेचे वाघ अशा धमक्यांना घाबरणारे नाहीत. भाजपकडून ज्या धमक्या दिल्या जात आहेत, त्याला सेना घाबरणार नाही, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

    परमबीर सिंग अजूनही मोकाट कसे?

    परमबीर सिंह यांच्याबाबतच्या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले की, अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या पत्रामुळे राजीनामा द्यावा लागला, पण आज ही परमवीरसिंह अजूनही मोकाट आहेत. परमबीर सिंह यांना रिपोर्ट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते, मग परमवीर सिंह मोकाट कसे?

    शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलेलं

    एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्याबाबत काही करार होता का, या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच, त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी आहे. परंतु शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे.

    State Minister Hasan Mushrif Criticizes BJP Over MLA Pratap Sarnaik Letter To CM Thackeray in Kolhapur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर- भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला; पाकिस्तानवर एअर स्ट्राइक, 24 क्षेपणास्त्रे डागली, 100 हून जास्त अतिरेकी ठार

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    अहिल्यानगरमध्ये पोलीस वसाहत अन् प्रशासकीय इमारतीच्या विकासासाठी 102 कोटींचा प्रकल्प