प्रतिनिधी
मुंबई : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याची माहिती, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. State Government approval for filling up the posts of Assistant Professor, Principal, Director of Physical Education, Librarian
पाटील म्हणाले, वित्त विभागाने २ हजार ८८ सहायक प्राध्यापक पदांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथिल करून ही पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, १०० टक्के रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे.
याशिवाय उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या पदांपैकी उर्वरित ग्रंथपाल : १२१ आणि शारीरिक शिक्षण संचालक : १०२ अशी एकूण २२३ पदे भरण्यास दिलेली स्थगिती शिथिल करण्याबाबत वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. या प्रस्तावास वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार पदभरतीस मान्यता देण्यात आल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
State Government approval for filling up the posts of Assistant Professor, Principal, Director of Physical Education, Librarian
महत्वाच्या बातम्या
- Delhi Excise Policy Case : मनीष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ
- ‘’तुमच्या सारखं आडनाव चोरून ‘गांधी’ झाले नाहीत’’ सावरकरांवरून काँग्रेसने केलेल्या टिप्पणीवर भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार!
- समीर वानखेडे, क्रांती रेडकर संघ मुख्यालयात; पण निवडणूक लढवण्याचे इरादे त्यांचे स्वतःचे की माध्यमांचे??
- राजपत्रित अधिकाऱ्यांचा सरकारी कर्मचाऱ्यांना पाठिंबा; २८ मार्चपासून संपात सहभागी