एसटी कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतला नसल्याने याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे.Start ST; Thousands of students took to the streets in Kolhapur
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांना घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी मागील दीड महिन्यांपासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतला नसल्याने याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे.
त्यातच कोरोना कालावधीनंतर आता शाळा, काॅलेज सुरु झाले असतानाच विद्यार्थ्यांना पायपीठ करावी लागत आहे. त्यात विद्यार्थ्यांना नियमित खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
दरम्यान, एसटीची वाहतूक सुरू करण्याच्या मागणीसाठी पन्हाळा तालुक्यातील कळे इथे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. एसटी सेवा बंद असल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवून एसटी सेवा सुरु करावी अशी मागणी या विद्यार्थ्यातून होत आहे.
Start ST; Thousands of students took to the streets in Kolhapur
महत्त्वाच्या बातम्या
- महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्हीची नजर; लोकलच्या प्रवासात गुन्हेगारीला आळा
- शिवसेना आमदारांची तक्रार खरीच; आमदार निधी वाटपात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी चौपट!!; काँग्रेसचीही सेनेवर आघाडी
- बांगलादेशातील भव्य रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन; पाकिस्तानी फौजेने केले होते उद्ध्वस्त!!; भारताने पुन्हा दिले बांधून!!
- पिंपरी : मनसेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड ; राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना घडला प्रकार