Olympic gold medalist Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी एकमेव सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राचे देशभरात ठिकठिकाणी सत्कार होत आहेत. देशाला ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजवर बक्षिसांचा आणि कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. लवकरच त्याच्या नावाने पुण्यातील स्टेडियम ओळखले जाणार आहे. याची अधिकृत घोषणा दस्तुरखुद्द देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करण्याची शक्यता आहे. Stadium at Pune’s Army Sports Institute to be named after Olympic gold medalist Neeraj Chopra
वृत्तसंस्था
पुणे : टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी एकमेव सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राचे देशभरात ठिकठिकाणी सत्कार होत आहेत. देशाला ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजवर बक्षिसांचा आणि कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. लवकरच त्याच्या नावाने पुण्यातील स्टेडियम ओळखले जाणार आहे. याची अधिकृत घोषणा दस्तुरखुद्द देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करण्याची शक्यता आहे.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 23 ऑगस्ट रोजी पुण्याला भेट देणार आहेत आणि या दौऱ्यात ते पुण्यातील स्टेडियमला नीरज चोप्राचे नाव देऊ शकतात. राजनाथ सिंह पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट देतील.
संरक्षण पीआरओने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, संरक्षण मंत्री आपल्या दौऱ्यादरम्यान लष्करी क्रीडा संस्थेच्या आवारातील स्टेडियमला ’नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पुणे कॅन्टोन्मेंट’ असे नाव देण्याची शक्यता आहे. राजनाथ सिंह यादरम्यान 16 ऑलिम्पियन खेळाडूंचा सत्कारही करतील, असेही प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
गोल्डन बॉय नीरज चोप्रा भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदावर आहेत. त्यांनी स्वतः आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतलेले आहे. भारतातील लाखो तरुणांचे आयकॉन म्हणूनही त्यांना ओळख मिळाली आहे.
Stadium at Pune’s Army Sports Institute to be named after Olympic gold medalist Neeraj Chopra
महत्त्वाच्या बातम्या
- Afghanistan : हवाई दलाच्या C-130J विमानाचे 85 हून अधिक भारतीयांसह उड्डाण, C-17देखील 250 नागरिक आणण्याच्या तयारीत
- विज्ञानाचे डेस्टीनेशन : मणिपूरच्या एका शेतक-याने केली कमाल, तांदळाच्या चक्क 165 प्रजातींचा लावला शोध
- जो बायडेन यांचा पुनरुच्चार, सैनिकांवर हल्ला झाला तर देणार चोख प्रत्युत्तर, आतापर्यंत १३ हजार जणांची सुटका
- तालिबानचा म्होरक्या पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात; परदेशातील गुप्तचर यंत्रणांना लागला सुगावा; भारताला पुरवली माहिती
- तब्बल ४५०० फूट व्यासाचा आणि १.४ किलोमीटर रुंदीचा एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावतोय