विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरमधील एसटी कर्मचाऱ्यांचा संप शुक्रवारी रात्री संपुष्टात आला. बऱ्याच बसेस पुन्हा रोडवर धावताना दिसून आल्या आहेत. गुरुवारी एसटी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे अल्टिमेटम देण्यात आले होते. कामावर रुजू न झाल्यास कामावरून काढून टाकण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर बऱ्याच एमएसआरडीसीचे हेड उत्तम पाटील यांनी हे आंदोलन मागे घेतले.
ST workers strike in Kolhapur called off on Friday night, 58 suspended employees will be reinstated
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जवळपास 70 टक्के आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. अनिल परब यांनी बाकीच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याची हमी देखील दिलेली आहे. एमएसआरटीसी डिव्हिजनचे कंट्रोलर रोहन पलंगे यांनी निलंबित केलेल्या 58 कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याची हमी दिलेली आहे. शनिवारी सकाळपासून ते कामावर रुजू होणार होते. असे उत्तम पाटील यांनी सांगितले आहे.
शुक्रवारी सकाळी कोल्हापूर इचलकरंजी बससेवा जवळपास 18 दिवसांच्या गॅपनंतर सुरू झालेली आहे. 20 बसेस कोल्हापूर मधून वेगवेगळ्या मार्गांवर निघाल्या. स्वारगेट, चंदगड, शेणोली, कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-इचलकरंजी, चंदगड,हलकर्णी, शेणोली आणि चंदगड पाटणे या सर्व बस सेवा पुन्हा चालू झालेल्या आहेत. बससेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ST workers strike in Kolhapur called off on Friday night, 58 suspended employees will be reinstated
महत्त्वाच्या बातम्या
- आळंदीकडे जाणाऱ्या दिंडीला वाहनाची धडक; दोन वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जखमी रुग्णालायात दाखल
- छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी चकमक, एका कुख्यात नक्षलवादी कमांडरला केले ठार
- ARJUN KHOTKAR : जालना येथील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल १२ तास चौकशी; रात्री २ पर्यंत ED पथक जालन्यात
- RED ALERT : दक्षिण भारतात Red Alert ; सलग 26 दिवस पावसाचा कहर ; केरळसाठी विशेष पूर सूचना