• Download App
    राज्यातील विविध आगाराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच ; कर्मचारी संपावर ठाम ST workers' agitation continues outside various depots in the state; Employees strike

    राज्यातील विविध आगाराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच ; कर्मचारी संपावर ठाम

     

    परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्याची नोटीस बजावली, पण कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. ST workers’ agitation continues outside various depots in the state; Employees strike


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणावर ठाम राहत आंदोलन आणि संप सुरूच ठेवला आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने निलंबित केले आहे, त्याचबरोबर बडतर्फीच्या नोटीसही बजावल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्याची नोटीस बजावली, पण कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.अशातच काल एसटी कर्मचारी संघटनेचे नेते अजय गुजर यांनी संपा मागे घेण्याची मोठी घोषणा केली होती.



    एसटी कर्मचारी संघटनेने २१ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य सरकारला सर्वात आधी संपाची नोटीस दिली होती.दरम्यान त्या संघटनेचे नेते अजय गुजर यांनी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे.दरम्यान, दोन दिवसांत एसटी सेवा पूर्ववत होईल, अशी आशा प्रशासनाला आहे. मात्र कर्मचारी संपावर ठाम राहिले आहेत.आझाद मैदानात उपस्थित कर्मचाऱ्यांनी यातून माघार घेणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

    कर्मचाऱ्यांनी २२ डिसेंबरपासून रात्री १२ वाजेपासून कामावर रुजू व्हावे.अशी एसटी संपाची नोटीस अजय गुजर यांनी दिली होती.जरी अजय गुजर यांनी संपातून माघार घेतली तरी त्यांना डावलून हा संप सुरुच राहणार असल्याची भूमिका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली आहे.

    ST workers’ agitation continues outside various depots in the state; Employees strike

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ