विशेष प्रतिनिधी
बीड – एसटीमध्ये खाद्यपदार्थ, पाणी बॉटल यासह इतर वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर एसटी बंदचा परिणाम दिसू लागलाय, ज्या ठिकाणी दिवसाला ६०० रुपये यांना पैसे मिळत होते. त्या ठिकाणी या कामगारांना केवळ १०० रुपये मिळवण्यासाठी दिवसभर कसरत करावी लागत आहे.ST workers agitatatin result to starvation food vendors : Hit the passengers too
बीड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी चार तारखेपासून बेमुदत संप पुकारलाय, परिणामी सर्व एसटी सेवा ठप्प आहे. त्यामुळे यावर आधारित व्यवसाय करणारे कामगारांवर उपासमारीची वेळ आलीय. वेफर्स, भेळ, बिस्कीट, पाणी बॉटल यासह इतर खाद्यपदार्थ विकून ही मंडळी उदरनिर्वाह करतात.
मात्र, मागील बारा दिवसांपासून एसटी बंद असल्याने यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. यातील अनेक कामगार पंधरा वर्षांपासून हाच व्यवसाय व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात,
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला बारा दिवस उलटून देखील तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सरकारने वेळीच एसटी कामगारांच्या मागण्यांवर विचार करून हा संप मिटवावा, अशी भावना या कामगारांनी व्यक्त केली.
ST workers agitatatin result to starvation food vendors : Hit the passengers too
महत्त्वाच्या बातम्या
- आता ‘ या ‘ जिल्ह्यात २० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू
- Mumbai Cruise Drugs Case : गोसावी आणि खबऱ्याची चॅट उघड, मुंबई पोलीस एसआरकेची मॅनेजर पूजा ददलानी बजावणार तिसरी नोटीस
- पूर्वांचल एक्सप्रेस वे वर झालेल्या विमानांच्या गर्जना काय सांगताहेत…??; वाचा पंतप्रधानांच्या भाषणातून…!!
- मोठी बातमी : उद्यापासून करतारपूर कॉरिडॉर पुन्हा उघडणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली घोषणा