बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ आणि वेतन हमीसंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या.ST Worker Protest: ST workers at Azad Maidan insist on merger!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावर संप चालू आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा केली. पण आझाद मैदानातील एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून त्यांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे.
दरम्यान बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ आणि वेतन हमीसंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. परंतु संपकरी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. सरकारचा हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. विलिनीकरणाशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान अशातच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानातील आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. पण एसटी कर्मचारी आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. ते आपल्या विलनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.
आंदोलनातून माघार घेत सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘राज्य सरकार निधी महामंडळाला वर्ग करेल. तसेच दर महिन्याला १० तारखेच्या आत पगार मिळेल असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. आमचा विलिनीकरणाचा लढा सुरूच राहणार आहे. पण सरकार दोन पावलं पुढे आले आहे ही आनंदाची बाब आहे.
पुढे खोत म्हणाले की , पहिला टप्पा आम्ही जिंकलो आहोत. न्यायालयाच्या निर्णयानंतर जर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला तर त्यात कामगारांसोबत आम्ही सुद्धा उभे राहू.पण राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे. त्यात आम्ही कर्मचाऱ्यांसोबत असू, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
ST Worker Protest: ST workers at Azad Maidan insist on merger!