• Download App
    ST Strike : अजित पवारांचा अल्टिमेटम एसटी कर्मचा-यांनी धुडकावला; संप सुरूच ठेवणाच्या निर्धार!!ST Strike: Ajit Pawar's ultimatum rejected by ST workers; Determination to continue the strike

    ST Strike : अजित पवारांचा अल्टिमेटम एसटी कर्मचा-यांनी धुडकावला; संप सुरूच ठेवणाच्या निर्धार!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कामगारांचा संप मागील तीन महिन्यांपासून सुरूच आहे. तरीही हा संप संपण्याचे नाव घेत नाही. एका बाजूला हायकोर्टाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करता येत नाही, असे म्हटले आहे, तर दुसरीकडे संपकरी कामगारांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.ST Strike: Ajit Pawar’s ultimatum rejected by ST workers; Determination to continue the strike

    त्यावर विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कामगारांना कामावर रुजू होण्यासाठी ३१ मार्च हा अल्टिमेटम दिला आहे, मात्र एसटी कामगारांनी हा अल्टिमेटम धुडकावून लावला आहे.



    आमचा न्यायदेवतेवर विश्वास 

    अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत रूजू होण्याचे आव्हान केले आहे. त्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी कर्मचारी हे सध्या दुखवटा करत आहेत. गेल्या पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करत आहोत, तरी देखील राज्य शासन आमच्याकडे लक्ष देत नाही,

    फक्त अल्टिमेटम देत आहे. आता आमची लढाई न्यायप्रविष्ट असल्याने आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. 5 एप्रिल रोजी आमच्या न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाची सुनावणी असून गुणरत्न सदावर्ते तसेच जयश्री पाटील हे वकील आमची बाजू मांडत असून त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी दिली.तसेच अजित पवार यांनी दिलेल्या अल्टिमेटमला आम्ही भीक घालत नाही, असे कमर्चारी चंद्रकांत पांचाळ म्हणाले.

    ST Strike: Ajit Pawar’s ultimatum rejected by ST workers; Determination to continue the strike

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस