• Download App
    लालपरी 15 डिसेंबर पासून समृद्धी महामार्गावर; 65 वर्षांवरील नागरिकांना 50 % सवलत ST from December 15 to Samriddhi Highway

    लालपरी 15 डिसेंबर पासून समृद्धी महामार्गावर; 65 वर्षांवरील नागरिकांना 50 % सवलत

    प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नागपुरात समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे 520 किलोमीटर अंतर आता अवघ्या 5 तासांवर येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटीची नागपूर – शिर्डी विनावातानुकुलित सेवा १५ डिसेंबरपासून समृद्धी महामार्गावरून सुरू होणार आहे. ST from December 15 to Samriddhi Highway

    15 डिसेंबरपासून नागपूर – शिर्डी महामार्गावर लालपरी धावणार आहे. नागपूरच्या गणेशपेठ येथून रात्री 9.00 वाजता बस शिर्डीसाठी रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5.30 वाजता शिर्डीत पोहोचेल. तसेच परतीच्या प्रवासासाठी शिर्डी येथून रात्री 9.00 वाजता बस सुटेल ही एसटी दुसऱ्या दिवशी सकाळी 5.30 वाजता नागपुरात दाखल होईल.

    किती असेल भाडे?

    • नागपूर-शिर्डी या मार्गावर विनावातानुकुलित एसटी बसचे तिकीट दर 1300 रुपये एवढे असणार आहे.
    • 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येईल.
    • 65 वर्षांवरील नागरिकांना तिकिटांवर 50 % टक्के सवलत देण्यात येणार आहे.

    समृद्धी महामार्गाची वैशिष्टये

    • लांबी 703 किलोमीटर
    • एकूण जमीन : 8311 हेक्टर
    • रुंदी : 120 मीटर
    • इंटरवेज : 24
    • अंडरपासेस : 700
    • उड्डाणपूल : 65
    • लहान पूल : 294
    • वे साईड अमॅनेटीझ : 32
    • रेल्वे ओव्हरब्रीज : 8
    • द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : 150 किलोमीटर (डिझाइन स्पीड)
    • द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे 12.50 लाख
    • कृषी समृद्धी केंद्रे : 18
    • एकूण गावांची संख्या : 392
    • प्रकल्पाचा अंदाजित खर्च: 55 हजार कोटी रुपये
    • एकूण लाभार्थी : 23500
    • वितरित झालेला मोबदला : 6,600 कोटी रुपये
    • कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : 356
    • द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत
    • ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे

    ST from December 15 to Samriddhi Highway

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे निधन

    राज्याची आर्थिक परिस्थिती ओढाताणीची पण राज्य कुठेही दिवाळखोरीकडे नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    निलंबित टीएमसी आमदार हमायून कबीर एआयएमआयएम सोबत आघाडीची घोषणा; बंगाल निवडणुकीत ‘गेम-चेंजर’ ठरणार असल्याचा दावा