प्रतिनिधी
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ दिली आहे. बोनसही दिला आहे. आता त्यांनी कामावर हजर राहावे अन्यथा त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांनी वारंवार दिला आहे. परंतु संपकरी एसटी कर्मचारी आपल्या एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या मूळ मागणीवर ठाम आहेत. ST employees have been given a 41 per cent pay hike.
या पार्श्वभूमीवर संपकरी कर्मचाऱ्यांवर ठाकरे – पवार सरकार मोठी कारवाई करण्याच्या बेतात आहे. परंतु याच मुद्द्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्यंगचित्र आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करून, “साहेब, तुम्ही दोन वर्ष मंत्रालयाची पायरी चढला नाहीत मग तुम्हाला निलंबित करायचे का?” असा खोचक सवाल केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जास्तीत जास्त काम घरात बसूनच करतात. त्यांना काही आजार आहे हे खरे आहे. परंतु, खूपच कमी वेळा ते मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसून काम करताना आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला निघालेल्या ठाकरे – पवार सरकारला उद्देशून संदीप देशपांडे यांनी साहेब, तुम्ही मंत्रालयाची पायरीही दोन वर्षात चढला नाहीत मग कारवाई करायची का? असा खोचक सवाल करणारे व्यंगचित्र ट्विटर हँडल वरून शेअर केले आहे.
ST employees have been given a 41 per cent pay hike.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींबरोबर भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा “क्लास” सुरू; राज्यांचा विकास आणि गुड गव्हर्नन्सवर सर्व मुख्यमंत्र्यांचे प्रेझेन्टेशन!!
- २८ डिसेंबर रोजी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर , शिवाजी पार्कवर सभा घेणार ; सभेच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल
- उसाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेली अग्निशामक गाडी जळून खाक ;माळेगाव कारखान्याचा दिवाणी न्यायालयाने नुकसान भरपाईचा दावा फेटाळला