कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.ST Corporation releases 40 suspended employees
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर गेल्या दोन महिन्यांपासून ठाम आहेत.दरम्यान या कर्मचाऱ्यांना सरकार वारंवार कामावर हजर राहण्याचे आवाहन करत आहे.परंतु आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
बुधवारी एसटी महामंडळाने ४० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून, आत बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ६०३ वर पोहोचली आहे.याशिवाय आतापर्यंत महामंडळाने १०,७६४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
महामंडळाने आतापर्यंत राेजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून १०,७६४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तर २,७९६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.दरम्यान आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस दिली जात आहे.तर गेल्या १५ दिवसांत १५३९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून बजावली.
ST Corporation releases 40 suspended employees
महत्त्वाच्या बातम्या
- आयआयटीच्या पदवीधारकांनी आरामाऐवजी आव्हानांचा पर्याय निवडावा – मोदी यांचे आवाहन
- महाराष्ट्रात पुन्हा वाढू लागला कोरोनाचा संसर्ग, पुढील दोन-तीन आठवडे महत्त्वाचे
- खाद्यतेलाच्या प्रमुख ब्रॅँडनी किंमती दहा ते पंधरा टक्यांनी केल्या कमी
- झाशीच्या राणीचा गौरव, झाशी रेल्वे स्टेशनचे वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन नामकरण