आता एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांवर आपली नोकरी कायमस्वरूपी घालवावी लागणार आहे.ST Corporation ready to take drastic steps; There is no solution to the ST strike
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे.दरम्यान आज राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एसटी कर्मचारी संयुक्त कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बैठक पार पडली.मात्र या बैठकीत एसटी संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही.
जरी तोडगा निघाला नसला तरी एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याबाबत आवाहन केलं होतं. पण तरीदेखील संप सुरुच असून संप आणखी चिघळत चालला आहे.त्यामुळे आता एसटी महामंडळ कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान आता एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांवर आपली नोकरी कायमस्वरूपी घालवावी लागणार आहे.तसेच निलंबन केलेल्या कर्मचाऱ्यांना देखील आता कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्याची कारवाई करण्याची भूमिका एसटी महामंडळाकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.
आत्तापर्यंत एसटी महामंडळाकडून काल 376 आणि आज 542 अशी आतापर्यंत 918 जणावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच जे कर्मचारी सरकारने सांगून सुद्धा पुन्हा कामावर रुजू झाले नाहीत, तसेच संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना कदाचित उद्यापासूनच कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय एसटी महामंडळ घेऊ शकतं.
ST Corporation ready to take drastic steps; There is no solution to the ST strike
महत्त्वाच्या बातम्या
- टायटॅनिक स्टार लिओनार्दो डिकॅप्रियो आणि लॉरेन सांचेझच्या व्हायरल व्हिडिओवर जेफ बेझोफ यांची प्रतिक्रिया
- संपामुळे राज्याचे हीत धोक्यात येत आहे,एसटी कर्मचाऱ्यांनी एकदा तरी विचार करायला हवा – संजय राऊत
- मुंबई महापालिकेचे ९ प्रभाग वाढविण्याचा निर्णय; पण कोणाच्या राजकीय पथ्यावर??
- गिर्यारोहकांचे साहस, “वजीर” सुळका सर सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाचे यश
- महाराष्ट्रातली चिखलफेक नाना पटोले – संजय राऊतांना असह्य!!; मोठ्यांनी लक्ष घालण्याचे आवाहन