प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० % सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस मधून महिलांना तिकीट दरात ५० % सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ST 50% discount ticket for women from today
या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ % पासून १०० % पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते.
यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात ५० % सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम शासन महामंडळाला देणार आहे.
ST 50% discount ticket for women from today
महत्वाच्या बातम्या
- CJI म्हणाले- कायदेशीर चर्चेत वापरल्या जाणार्या अयोग्य लैंगिक शब्दांवर बंदी घालण्यात येईल, नवीन शब्दकोश लवकरच येणार
- अदानी – अंबानींना टार्गेट करून काँग्रेसचे राजकीय भांडवली मूल्य कसे काय वाढेल??
- Coronavirus : करोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने पाठवले सहा राज्यांना पत्र!
- योगी सरकराच्या सहा वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात ६३ गुन्हेगारांचा खात्मा; ५ हजारांहून अधिकांच्या मुसक्या आवळल्या!