• Download App
    कोरोनामुळे श्रीलंका भिकेचे डोहाळे, आर्थिक संकटामुळे दिवाळखोरी जाहीर करण्याची शक्यताSri Lanka is poor due to corona, possibility of declaring bankruptcy due to financial crisis

    कोरोनामुळे श्रीलंका भिकेचे डोहाळे, आर्थिक संकटामुळे दिवाळखोरी जाहीर करण्याची शक्यता

    वृत्तसंस्था

    कोलंबो : कोरोना संकटामुळे अनेक देशांत आर्थिक संकट निर्माण झाले आहे. एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे विविध देशांच्या अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर असून श्रीलंकेला कोरोना संक्रमणाची मोठी झळ बसल्याचे वृत्त आहे. येत्या वर्षभरात श्रीलंका भिकेला लागण्याचा धोका वाढला असून ती दिवाळखोरी जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. Sri Lanka is poor due to corona, possibility of declaring bankruptcy due to financial crisis



    कोरोनामुळे तेथील मानवी आयुष्यावर आणि देशावर आर्थिक संकट घोंघावत आहे. गार्डीयनच्या अहवालानुसार २०२२ हे वर्ष श्रीलंकेसाठी धोकादायक आहे. या वर्षात देशांतर्गत आणि परदेशी कर्जाचा डोंगर हा ७. ३ अब्ज डॉलर एवढा असून ते कर्ज पुढील १२ महिन्यात फेडायचे आहे.

    जागतिक बँकेच्या अहवालानुसार कोरोना संक्रमण सुरु होण्यापूर्वीपासून श्रीलंकेत ५ लाखांवर लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन कंठत आहेत. कर्ज आणि गरिबांची लोकसंख्या पाहता श्रीलंका ही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

    Sri Lanka is poor due to corona, possibility of declaring bankruptcy due to financial crisis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!