• Download App
    Sri Chinmoymurthy Sansthan श्री चिन्मयमूर्ती संस्थानकडून पंढरीच्या विठूरायास साडेसतरा लाखांचा सुवर्ण तुळशीहार अर्पण!

    श्री चिन्मयमूर्ती संस्थानकडून पंढरीच्या विठूरायास साडेसतरा लाखांचा सुवर्ण तुळशीहार अर्पण!

    उमरेखड येथील श्री चिन्मयमूर्ती संस्थान मठाधिपती माधवानंद महाराज यांचा करण्यात आला सन्मान Sri Chinmoymurthy Sansthan

    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर – यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील श्री चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती माधवानंद महाराज गुरु वामनानंद स्वामी यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊन, २२ जून रोजी एकदशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी १७ लाख ६८ हजार किंमतीचा सुवर्ण तुळशीहार अर्पण केला.

    माधवानंद महाराज यांनी आपल्या भक्तासह पंढरपूर येथे जाऊन विठूरायाला सुवर्ण तुळशीहार अर्पण केला. त्यानंतर पंढरपूरच्या मंदिर समितीच्यावतीने व्यवस्थापक मनोज श्रोती यांनी श्रींची प्रतिमा आणि उपरणे देऊन, येथोचित सन्मान केला. हा सुवर्ण तुळशीहार २३२.९९० ग्रॅम वजनाचा होता आणि त्याची अंदाजे किंमत १७ लाख ६८ हजार रुपये होती.

    हा सुवर्ण हार विठूरायाला अर्पण करताना उमरेखड येथील चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती श्री माधवानंद महाराज यांच्यासोबत संस्थानचे कुलमुख्त्यार अ‍ॅड. महेश कनकदंडे, कुलमुख्त्यार संदीपराव माहोरकर, सुर्यकांत रत्नपारखे, माधवानंद महाराजांसोबत असणारे सर्व मुख्य ब्रह्मवृंद आणि मराठवाडा, विदर्भातील शिष्य परिवार उपस्थित होता.

    Sri Chinmoymurthy Sansthan offers golden Tulsi Har worth 17.5 lakhs to Shri Vitthal Rukmini of Pandhari

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Malegaon sugar factory election बारामती नाही उरली एकतर्फी, हा खरा माळेगावच्या निवडणुकीचा संदेश!!

    बारामतीकरांचा पवारांना आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का; माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव!!

    Eknath Shinde : अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा; निधी कुठे वितरीत होतो याची माहिती घ्या, एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश