येरवडा कारागृहातून खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक केली आहे. येरवडा कारागृह येथे बंदयांसाठी क्रीडा प्रशिक्षण लवकरच सुरू करणार असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. Sports training for prisoners starting at Yerawada Jail
विशेष प्रतिनिधी
पुणे: येरवडा कारागृहातून खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक केली आहे. येरवडा कारागृह येथे बंदयांसाठी क्रीडा प्रशिक्षण लवकरच सुरू करणार असल्याची माहिती कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली.
येरवडा कारागृह येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्र कारागृह विभाग व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘परिवर्तन-प्रिझन टू प्राईड’ या उपक्रमाचे उदघाटन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कॅरम, व्हॉलीबॉल व बुद्धिबळ यासाठी बंदयांचे प्रशिक्षण लवकरच सुरू करण्यात येणार असून येरवडा कारागृहामधून 60 बंदयांनी या खेळासाठी संमती दर्शवली आहे. महिला बंदयाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि खेळासाठी संधी देण्यात येणार आहे अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
Sports training for prisoners starting at Yerawada Jail
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला