दावरी स्वच्छता अभियानाला गोदा सेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; स्वच्छतेच्या कामी लागले हजारो हात!!
रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि इस्कॉनच्या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद
विशेष प्रतिनिधी
नाशिक : गोदावरी स्वच्छता अभियानासाठी हजारो नाशिककर आज गोदा घाटावर उतरले. त्यांचे हजारो हात आज गोदा स्वच्छतेच्या कामात मग्न झाले होते. Spontaneous response of Goda servants to Godavari cleanliness campaign;
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सदस्य चिराग पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे गोदावरी स्वच्छ अभियानासाठी आज सकाळी 7.00 वाजता आर्ट ऑफ लिविंग आणि इस्कॉन यांच्या संयुक्त विद्यमाने हजारो गोदा सेवक स्वच्छता अभियानासाठी आले होते.
या गोदा सेवकांनी प्रामुख्याने गोदा प्रवाह, घाट आणि परिसर याची स्वच्छ्ता केली. प्रामुख्याने गोदावरी आरती सोबत गोदावरीचा प्रवाह आणि घाट यांची स्वच्छता देखील होत असल्याने गोदा सेवकांमध्ये प्रचंड भक्तिभाव निर्माण होत असल्याचे जाणवले.
शिवजयंती पासून सुरू झालेल्या गोदावरी आरती आणि आज झालेल्या स्वच्छता अभियानामध्ये तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसत आहे. सर्व सहभागी नागरिकांमध्ये 60 ते 70 % मध्ये तरुण सहभागी झाल्याचे दिसून आले. या बहुविध उपक्रमामुळे गोदावरी तीरी भविष्यात चांगल वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. स्वच्छता अभियानाला स्थानिक आणि भाविक यांचे चांगले सहकार्य लाभले, असा विश्वास नाशिककरांमध्ये निर्माण झाला आहे.
आजच्या गोदावरी स्वच्छता अभियानाला समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष नृसिंहकृपा दास, सचिव मुकुंद खोचे खजिनदार आशिमा केला, सदस्य प्रफुल्ल संचेती, कविता देवी, शैलेश देवी, शिवाजी बोंदर्डे, राजेंद्र फड आदी उपस्थित होते.
Spontaneous response of Goda servants to Godavari cleanliness campaign;
महत्वाच्या बातम्या
- मोदी बिहारला पूर्णिया मेडिकल कॉलेजसह 12 रुग्णालयांना भेट देणार
- प्रशांत किशोर यांनी 2024 च्या निवडणुकीचे वर्तवले भाकीत!
- शेतकऱ्यांचे ‘दिल्ली चलो’ आंदोलन 29 फेब्रुवारीपर्यंत स्थगित
- नमो महारोजगार मेळाव्यातून 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वंयरोजगार देण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे