प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या वज्रमूठ सभेत महाविकास आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भाषणातून मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षाचा विषय आज गायब झालेला दिसला. गेले काही दिवस महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षाच्या बातम्या गाजत आहेत. त्यावर वज्रमूठ सभेत एका मुस्लिम मावळ्याने, “उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री फिक्स”, असे रक्ताने लिहून आधीच पाणी फिरवले होते, तर उद्धव ठाकरे अजितदादा आणि अशोक चव्हाण या मुख्य नेत्यांनी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेवर बोलणे टाळले. speech of Thackeray-Ajitdada-Ashok Chavan in the Vajramooth meeting of Mumbai.
ठाकरे, पवार आणि चव्हाण या तिन्ही नेत्यांनी आपला सगळा रोख महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यावरच शरसंधान साधण्यावर ठेवला. उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्पाचा उल्लेख करत आपण 6 मे रोजी बारसू मध्ये जाणार असून तिथे जाहिरीत्या बोलू. बारसू म्हणजे पाकिस्तानव्याप्त काश्मीर नाही. तेथे कोकणवासीयांवर अन्याय होऊ देणार नाही, असे जाहीर केले. शिंदे – फडणवीस सरकार मधील मंत्री उदय सामंत यांनी आज शरद पवारांची भेट घेऊन या प्रकल्पातला अडथळा असलेल्या उद्धव ठाकरे यांचा काटा परस्पर पवारांच्या काट्याने काढण्याचा प्रयत्न केला होता.
पण आता स्वतः उद्धव ठाकरे यांनी आपण 6 मे रोजी बारसू मध्ये जाणार असल्याचे जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातले शिंदे – फडणवीस सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यातला संघर्ष आता मुंबई बाहेर कोकणात बारसू मध्ये होणार आहे.
या दरम्यानच्या 5 दिवसांमध्ये शरद पवार बारसू प्रकल्पाबाबत नेमकी काय भूमिका घेणार?, उद्धव ठाकरे यांना प्रकल्पाच्या बाजूने वळविणार की एकीकडे शिंदे – फडणवीस सरकारशी बोलणे चालू ठेवून, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनाही आंदोलनासाठी फूस लावणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
speech of Thackeray-Ajitdada-Ashok Chavan in the Vajramooth meeting of Mumbai.
महत्वाच्या बातम्या
- ” उबाठाचा प्रवास ‘ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे’ असल्याने भविष्यात…” आशिष शेलारांनी लगावला टोला!
- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत 317 तालुक्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमाचा प्रारंभ
- 263 कोटी रुपयांच्या कथित ‘स्ट्रीट फर्निचर घोटाळा’प्रकरणी आदित्य ठाकरे यांचा बीएमसीला सवाल
- भिवंडीतील कोसळलेल्या इमारतीचा मालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात