प्रतिनिधी
रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५० वे वर्ष आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून किल्ले रायगडावर दिमाखदार सोहळा सुरू आहे. देशभरातून शिवप्रेमी किल्ली रायगडावर दाखल झाले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री रायगडावर दाखल झाले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच यावेळी सर्व शिवभक्तांना शपथ देण्यात आली. Spectacular coronation ceremony of Shiva at Raigad fort
३५० वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा भव्यदिव्य आणि अद्भूत होता. अनेक राजे, महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित होते. गागाभट्ट्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ संपन्न झाला होता. त्यावेळेला जे रिती-रिवाज केले गेले, त्याच परंपरेचे आणि पूजा-अर्चाचे पालन आजच्या दिवशी करून शिवराज्याभिषेक सोहळा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मंत्री महोदय रायगडावर दाखल झाले आहेत. संपूर्ण रायगड शिवभक्तांच्या उत्साहाने गजबजला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक केला. तसेच त्यानंतर शिवभक्तांना शपथ दिली.
दरम्यान राज्य शासनाच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याला गुरुवारी शिर्काईमातेच्या पूजनाने सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभरात रायगडावरील गंगासागर तलाव आणि विविध देवदेवतांचे पूजन करण्यात आले. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर ५ आणि ६ जून या कालावधीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
Spectacular coronation ceremony of Shiva at Raigad fort
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी यांनी मुस्लिम लीगला दिले धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमाणपत्र, भाजपचा पलटवार- असे सांगणे त्यांची मजबुरी!
- Chief Minister Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण
- मुंबईच्या मालवणीत बांगलादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा