वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना ठाकरे सरकारने केली आहे. Special Task Force Of Paediatricians Set Up For The Third Wave Of Corona
विषाणूमध्ये होणाऱ्या जनुकीय बदलांमुळे तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता आहे. त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसीत करण्यासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. टास्क फोर्समध्ये १३ सदस्य असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक त्याचे सदस्य सचिव आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बालरोग तज्ञांशी संवाद साधून तिसरी लाट आल्यास मुलांच्या उपचाराबाबत चर्चाही केली होती. मुलांमधील कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी उपचारपद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ञांच्या या विशेष कृती दलात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील तज्ञांचा सदस्य
समावेश करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Special Task Force Of Paediatricians Set Up For The Third Wave Of Corona
महत्त्वाच्या बातम्या
- अविश्वास ठराव आणल्याने चिडून पंचायत समिती सभाकडून सदस्यांवर हल्ला, खेड तालुक्यातील शिवसेनेतील सुंदोपसुंदी उघड
- केजरीवाल सरकारपेक्षा जास्त दिल्लीच्या खासगी रुग्णालयांनी लसींचा बंदोबस्त केला – संबित पात्रा
- मराठा आरक्षणासाठी आताच रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा
- दहावी झालेला करत होता डॉक्टर म्हणून काम, पिंपरीत बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल
- राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अखेर अटक, खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे