• Download App
    Suresh Dhas बीड कारागृहात वाल्मीक कराडकडे स्पेशल फोन,

    Suresh Dhas : बीड कारागृहात वाल्मीक कराडकडे स्पेशल फोन, आमदार सुरेश धस यांचा दावा

    Suresh Dhas

    विशेष प्रतिनिधी

    बीड : Suresh Dhas वाल्मीक कराड प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. बीड जिल्हा कारागृहात एक स्पेशल फोन सापडला आहे. हा फोन आका अर्थात वाल्मीक कराड वापरत होता. या फोनचे कॉल डिटेल्स काढले तर सर्व काही काळेबेरे बाहेर येईल, असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला.Suresh Dhas

    सुरेश धस यांनी बुधवारी कृषि खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र लिहून कृषि खात्यातील कथित घोटाळ्याचा अहवाल मागवला. त्यांनी हा तहब्बल 169 कोटींचा घोटाळा असल्याचा दावा केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रकरणासह महादेव मुंडे हत्या प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या कुटुंबासह उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्याची मला माहिती आहे. त्या माऊलीची काय चूक आहे? 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली. पण अद्यापही त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. आत्ता विष पिऊनही झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता त्यांना भेटण्याची वेळ दिली आहे. निश्चितपणे ते त्यांचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांपुढे मांडतील. त्यानंतर त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.Suresh Dhas



    धस म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तो जो छोटो फोन आका वापरत होते, त्या आकाने जो फोन वापरला आहे, त्याचे डिटेल्स घेतले तर यातील सर्वकाही बाहेर पडेल. महादेव मुंडे यांचे प्रकरण सुरूवातीला मी स्वतः काढले होते. तत्पूर्वी, कुणीही या प्रकरणात नव्हते. सर्वात अगोदर मी बोललो होतो.

    अजित पवारांनी कृषि घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्यामुळे माजी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिलेत. सुरेश धस यावर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा असल्याचे ते म्हणाले. मी त्या मुद्यावर बोलणार नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु या बाबतीत प्रकाश साळुंके बोलले आहेत. त्या क्लीन चिटच्या विरोधात काही लोक सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.

    Special call to Valmik Karad in Beed jail, claims MLA Suresh Dhas

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Prithviraj Chavan : भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा, माजी CM पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य; शिंदेंच्या शिवसेनेचा मुंबईत मोर्चा

    Raj Thackeray : राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान- अटक करून दाखवाच; फडणवीसांचेही प्रत्युत्तर- अर्बन नक्षलीसारखे वागाल तर तुम्हालाही अटक होईल

    पृथ्वीराज चव्हाणांच्या सनातनी आतंकवाद या विधानावरुन प्रकाश महाजनांनी त्यांना सुनावले; शिंदे सेनाही आक्रमक