• Download App
    कल्याण, डोंबिवलीतील १७ वारसास्थळांचे दर्शन केडीएमटीची पर्यटन बससेवेला सुरुवात |Special bus service to visit 17 heritage sites in Kalyan, Dombivali

    कल्याण, डोंबिवलीतील १७ वारसास्थळांचे दर्शन केडीएमटीची पर्यटन बससेवेला सुरुवात

    विशेष प्रतिनिधी

    कल्याण : कल्याण, डोंबिवली, टिटवाळा भागांतील एकूण १७ वारसा स्थळांचे दर्शन केडीएमटीची  पर्यटन बससेवेमुळे पर्यटकांना घेता येणार आहे.ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसास्थळांची समग्र माहिती मिळावी, या उद्देशातून कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने पर्यटन बससेवा मंगळवारपासून सुरू केली आहे. या उपक्रमात १७ ऐतिहासिक ठिकाणांची माहिती आठ तासांत मिळणार आहे.Special bus service to visit 17 heritage sites in Kalyan, Dombivali

    करोनामुळे रहिवाशांना घराबाहेर पडता आले नाही. पर्यटनाची हौस भागविता आली नाही. त्यांना ही बस म्हणजे एक पर्वणी आहे. पर्यटक सेवेत २२ आसनांची बस आहे. ४८ तास अगोदर तिकीट नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवाशांची नोंदणीनंतर बसफेरीची माहिती दिली जाईल.



     

    ही बस सकाळी ९ वाजता प्रवासाला सुरुवात करेल आणि सायंकाळी ५ वाजता प्रवास संपेल. आठ तासांत ही बस ९० किलोमीटर धावेल. ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, सामाजिक संस्थांचे महिला, पुरुष कार्यकर्ते, सोसायटीतील कुटुंबीय, शाळा गटसमूहाने या बससाठी नोंदणी करू शकतात. ज्येष्ठ नागरिक आपला वाढदिवस मित्रांसोबत पर्यटनस्थळे पाहताना साजरा करू शकतात.

    शाळा आपल्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक ठिकाणांची माहिती देऊ शकतात. पाहुण्याला शहराची ऐतिहासिक, सांस्कृतिक ओळख करून देण्यासाठी रहिवासी या पर्यटन बसचा उपयोग करू शकतात.

    •  केडीएमटीची विशेष पर्यटन बससेवा सुरु
    • ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसास्थळे पाहता येतील
    • कल्याण-डोंबिवली पालिकेचा उपक्रम
    • पर्यटक सेवेत २२ आसनांची बस आहे
    • ४८ तास अगोदर तिकीट नोंदणी करणे आवश्यक
    • ज्येष्ठ, विद्यार्थी यांना वारसा स्थळांची माहिती होणार

    Special bus service to visit 17 heritage sites in Kalyan, Dombivali

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस